भारताच्या चांद्रयान 3 ला जे जमलं नाही ते जपानच्या स्लिम लँडरने करुन दाखवलं

जपानच्या स्लिम लँडरने नवा विक्रम रचला आहे.  भारताचे चांद्रयान 3 जे करुन शकलं नाही ते स्लीम लँजरने करुन दाखवले आहे. 

वनिता कांबळे | Updated: Feb 26, 2024, 06:27 PM IST
भारताच्या चांद्रयान 3 ला जे जमलं नाही ते जपानच्या स्लिम लँडरने करुन दाखवलं title=

Chandrayaan-3 Vs Japan SLIM Moon Probe : जपानचे मून मिशन जवळपास यशस्वी झाले आहे. भारताच्या चांद्रयान 3 ला जे जमलं नाही ते जपानच्या स्लिम लँडरने करुन दाखवलं आहे. जपानच्या स्लिम लँडरने नवा विक्रम रचला आहे. जपानी स्पेस एजन्सी जाक्साने JAXA ने सोशल मिडियावर या नव्या विक्रमाची माहिती शेअर केली आहे.  यामुळे जपानच्या मून मिशनने पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. 

14 जुलै 2023 रोजी भारताचे चांद्रयान 3 चंद्राकडे झेपावले. यानंतर 23 ऑगस्ट 2023 रोजी भारताच्या चांद्रयान 3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केले. यानंतर  07 सप्टेंबर 2023 रोजी जपानचे स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) अर्थात मून स्नायपरने आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) लाँच झाले. जपानचे स्लिम लँडरने चंद्राकडे झेप घेतली. जपानी स्पेस एजन्सी JAXA च्या तानेगाशिमा स्पेस सेंटरच्या योशिनोबू लॉन्च कॉम्प्लेक्समधून H-IIA रॉकेटद्वारे जपानच्या स्लिम लँडर लाँच करण्यात आले. 19 जानेवारी रोजी रात्री 9 च्या सुमारास जापानचे स्मार्ट लँडर चंद्रावर लँड झाले. भारताचे चांद्रयान 3 हे फक्त 40 दिवसात चंद्रावर पोहचले होते.  जपानचे यान 6 महिन्यांनी चंद्रावर पोहचले. 

जपानच्या मून लँडर स्लिमचे अचूक लँडिंग

जपानच्या मून लँडर स्लिमने अचूक लँडिंग केले.  जपानी स्पेस एजन्सी JAXA ने आपल्या यानाच्या लँडिंगसाठी जागा निश्चित केली होती. निश्चित जागेवरच हे यान लँड झाले.  जपानी स्पेस एजन्सी JAXA ने लँडिंगसाठी 600x4000 किमी जागा निवडली होती. या जागेत 100 मीटरच्या आतच या यानाने अचूक लँडिंग केले आहे. चंद्रावरील शिओली क्रेटर या जागेवर जपानचे हे यान लँड झाले. शिओली क्रेटर या जागे जागेला Mare Nectaris असेही म्हणातात. हा प्रदेश चंद्राचा समुद्र म्हणून ओळखला जातो. चंद्रावरील या जागेत खूप गडद अंधार असतो. मात्र, लँडिंग वेळी जपानच्या स्लिम लँडर आडवा झाला. येथे सूर्य प्रकाश पडत नसल्याने  लँडर सोलर पॉवर पावर सप्लाय निर्माण करण्यास अकार्यक्षम ठरत होते.  पुरेसा सुर्यप्रकाश पडत नसल्याने सोलर पॅनल चार्ज होत नव्हते.  सोलर पॅनलला पुरेशा सूर्य प्रकाश मिळावा यासाठी त्याची दिशा बदलण्यात आली. 

नेमकं काय केल आहे जपानच्या स्लिम लँडरने

अखेरीस दहा दिवसानंतर सोलर पॅनलची दिशा बदलण्यात यश आले. सोलर पॅनलवर पुरेशा प्रकाश पडत असल्याने बॅटरी चार्ज होऊन लँडर पूर्ण क्षमतेने सक्रिय झाला. विशेष म्हणजे चंद्रावरील कडाक्याच्या थंडीतही  लँडर सक्रिय आहे. Chandrayaan-3 मात्र, चंद्रावरील या विचित्र तापमानात काम करु शकले नाही.