मुंबई : सध्या पावसाचे दिवस आहेत, काही लोकांना हा ऋतू आवडो परंतु लोकांना पावसामुळे अनेक गोष्टींचा त्रास देखील सहन करावा लागतो. पावसामुळे पाणी तुंबते ज्यामुळे काही घरांचे नुकसान देखील होते. तर काही वेळा पावसामुळे आणि वाऱ्यामुळे झाड देखील पडण्याच्या घटना घडतात. तर बऱ्याच वेळा भुस्खलन किंवा दरड कोसळल्याच्या देखील घटना घडतात, ज्यामुळे अनेक गोष्टींचे नुकसान होते. परंतु यात सगळ्यात जास्त नुकसान होते ते म्हणजे कार आणि घरांचे.
परंतु तुम्ही म्हणाल की, कारचे नुकसान तर इन्शुरन्स कंपनीकडून भरुन दिले जाऊ शकते. त्यात विचार करण्यासारखे काही नाही. परंतु असे सगळ्या घटनेत शक्य होत नाही. फक्त काही गोष्टींसाठीच इन्शुरन्स कंपनी क्लेम स्वीकारते. अशात तुम्हाला कार इंश्योरन्ससंदर्भात काही माहिती असणे महत्वाचे आहे.
यासाठी पहिल्यांदा तुम्हाला हे पाहावे लागेल की, तुमची इन्शुरन्स कंपनी तुम्हाला नैसर्गिक रित्या झालेल्या अपघाताला क्लेम देते की, नाही ते. कारण अशा खुप कमी कंपन्या आहेत, ज्यांच्या नियमानुसार तुम्ही नैसर्गिक आपत्तींवर क्लेम करु शकता. त्यामुळे हे आधी तुमच्या कंपनी कडून माहित करुन घ्या आणि तुम्ही नवीन इन्शुरन्स काढणार किंवा रिन्यूअल करणार असाल तर तुमच्या कंपनीला हे विचारा आणि नैसर्गिक आपत्तींवर क्लेम करुन देणाऱ्या कंपनीचा इन्शुरन्स घ्या.
Money9 मधील एका अहवालानुसार, तुम्ही तुमच्या कारचा कॉम्प्रिहेंसिव इन्शुरन्स उतरवला असेल, तरच तुम्ही अशा परिस्थितीत कारच्या इन्शुरन्सचा दावा करू शकता.
कॉम्प्रिहेंसिव पॉलिसी असल्यावरच पावसाळ्यात झाडे पडणे, भूस्खलन झाल्यामुळे वाहनाला झालेल्या नुकसानीसाठी तुम्ही दावा करू शकता. ज्यामुळे तुम्हाला जर नैसर्गिक आपत्तीअंतर्गत तुमच्या कारचा इन्शुरन्स क्लेम करायचा असेल तर तुम्हाला यासाठी कॉम्प्रिहेंसिव पॉलिसी घ्यावी लागेल.
परंतु तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई केवळ सर्वसमावेशक पॉलिसीमध्ये केली जाऊ शकते. परंतु थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये असे नसते.
आता प्रत्येक वाहनासाठी इन्शुरन्स सक्तीचं करण्यात आला आहे. त्यात तृतीय पक्ष विमा म्हणजेच थर्जपार्टी इन्शुरन्स देखील यामध्ये वैध धरले जाते. अशा परिस्थितीत बहुतेक लोकं थर्ड पार्टी इन्शुरन्स घेतात. कारण यावर त्यांना फार कमी हफ्ता किंवा प्रिमीयम भरावा लागतो.
परंतु, हा इन्शुरन्स नैसर्गिक आपत्तीसाठी क्लेम देत नाही. म्हणून हा इन्शुरन्स घेताना हे सगळे नियम तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.
जर तुमच्या कार किंवा गाडीला काही झालं, तर त्याच वेळेला लगेच तुमच्या इन्शुरन्स कंपनीला कॉल करा आणि त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा.
यासह, त्या कारच्या परिस्थितीचे फोटो किंवा व्हिडीओ रेकॉर्डिंग करणे देखील आवश्यक आहे. याशिवाय इन्शुरन्स कंपनीने मागितलेली कागदपत्रे देखील तयार ठेवा. परंतु त्यानंतर देखील अनेक अटींच्या आधारे तुमचा दावा मंजूर केला जाईल.