महिलांनी पायात जोडव्या का घालाव्यात? जाणून घ्या या मागील वैज्ञानिक कारण

पायात रिंग किंवा जोडव्या घालणाऱ्या महिला तुम्ही पाहिल्या असती, परंतु ते हे पायत का घलतात?

Updated: Feb 16, 2022, 08:54 PM IST
महिलांनी पायात जोडव्या का घालाव्यात? जाणून घ्या या मागील वैज्ञानिक कारण title=

मुंबई : भारत हा विविधतेचा देश आहे. येथे अनेक जातीचे आणि समुहाचे लोक येथे राहातात. त्यामुळे येथे एकच सण वेगवेगळ्या पद्धतींनी साजरा केला जातो. जे पाहण्यात आणि जाणून घेण्यात फार गंमत आहे. वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक आपआपल्या परंपरेनुसार कपडे आणि दागिने घालतात. त्यांपैकी एक असलेल्या बिचिया म्हणजे जोडवी हा एक असा दागिना आहे, जो हिंदू महिला वापरतात. याला टो रिंग असे ही म्हणतात.

पायात रिंग किंवा जोडव्या घालणाऱ्या महिला तुम्ही पाहिल्या असती, सहसा लग्न झालेल्या महिला हे घालतात. परंतु ते हे पायत का घलतात? या मागील कारण तुम्हाला माहित आहे? 

सध्याच्या काळात, समाजाचा विकास होत असताना, अनेक स्त्रिया पायातील या जोडव्यांना सनातनी विचारसरणीचे उत्पादन मानतात, परंतु त्यांना हे माहित नाही की जोडव्या या केवळ श्रद्धा किंवा प्रथा पाळण्यासाठी घातल्या जात नाहीत. तर यामागे एक वैज्ञानिक कारण देखील आहे जी प्रत्येक स्त्रीने जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

महिलांचे आरोग्य चांगले राहते

असे मानले जाते की, पायाच्या अंगठ्याच्या बाजूच्या बोटाच्या नसा थेट हृदयाशी आणि स्त्रियांच्या गर्भाशयाशी जोडलेल्या असतात. अशा स्थितीत जेव्हा या बोटावर दाब येतो, तेव्हा शिराही दाबल्या जातात, त्यामुळे नसांमध्ये रक्ताभिसरण सुरळीत होते. ज्यामुळे या जोडव्या किंवा रिंग एक्यूप्रेशरचे काम करतात.

अशाप्रकारे महिलांचा रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि गर्भाशयात जाणारे रक्तही व्यवस्थित वाहते, त्यामुळे मासिक पाळीत कोणतीही समस्या येत नाही. ज्या स्त्रियांना अनियमित मासिक पाळी येण्याच्या तक्रारी आहेत त्यांच्यासाठी देखील हे चांगले मानले जाते.

स्त्रिया चांदीच्या जोडव्या का घालतात?

स्त्रियांना पायात तुम्ही सहसा फक्त चांदिच्या जोडव्या घातलेलं पाहिलं असेल. परंतु सोन्याच्या जोडव्या घातलेलं तुम्ही क्वचितच कोणाला पाहिले असेल. यामागेही एक खास कारण आहे.

खरेतर सोन्याला लक्ष्मीचे रूप मानले जाते. अशा परिस्थितीत स्त्रिया कमरेच्या खाली सोन्याचे कोणतेही दागिने घालत नाहीत, कारण हा देवीचा अपमान मानला जातो.

दुसरे कारण म्हणजे चांदीला विजेचा चांगला वाहक मानला जातो. चांदी पृथ्वीवरील ध्रुवीय ऊर्जा शोषून घेते आणि ती आपल्या शरीरात पोहोचवते. अशा प्रकारे ही ऊर्जा आपल्या शरीरात पसरते. ज्यामुळे मुख्यत्वे चांदीला कमेरच्या खाली घातले जाते. म्हणून आपण जोडवी, पैंजन आणि कमरेची साखळी चांदिची घालतो.