मित्रांचा नादच करायचा नाय... वरातीत यांनी नवरदेवाला असा काही सल्ला दिला जो ऐकून नवरदेवाला फूटला घाम

नवरदेवाचे मित्र लग्नापूर्वी वरातीदरम्यान आपल्या मित्राची खेचू लागतात,

Updated: Oct 6, 2021, 07:38 PM IST
मित्रांचा नादच करायचा नाय... वरातीत यांनी नवरदेवाला असा काही सल्ला दिला जो ऐकून नवरदेवाला फूटला घाम title=

मुंबई : प्रत्येक लग्नात मजा मस्करी ही तर होतच राहाते. प्रत्येक जण आपल्या मित्र-मैत्रिणीच्या लग्नात असं काही ना काही करतचं ज्यामुळे उपस्थीत लोकांना हसू फूटते. सध्या लग्नाचा सिजन सुरू असल्याने आपल्याला सोशल मीडियावर देखील दररोज काहीना काही व्हिडीओ पाहायला मिळतात. जे आपल्याला हसवतात तर काही वेळा आपल्या समोर उदाहरण ठेवतात. सध्या सोशल मीडियावर असाच एका लग्नाच्या वरातीमधील व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्येही तुम्ही पाहू शकता की नवरदेवाचे मित्र लग्नापूर्वी वरातीदरम्यान आपल्या मित्राची खेचू लागतात, जे पाहून तुम्हाला ही हसू येईल.

लग्नापूर्वी वराच्या मित्रांनी असा इशारा दिला

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, नवरदेव आपल्या कुटुंबासह वरातीत चालत आहे आणि त्यानंतर त्याचे दोन मित्र त्याच्या शेजारी फिरत आहेत. त्यावेळेस या नवरदेवाचे दोन्ही मित्र एक गाणे गातात आणि नवरदेवाला समजावून सांगतात की लग्नानंतर तू रडशील, पश्चात्ताप करशील.

परंतु नवरदेवाचे मित्र हे सगळं त्याला नुसतच बोलून सांगत नाहीत, तर त्याला पंजाबी गायक प्रभा गिल यांच्या 'तू रोएगा, पच्छतेगा ...' या प्रसिद्ध गाण्याच्या आधाराने आणि ते गात हे सांगतात जे पाहून तुम्हाला खूप हसू येईल.

नवरदेव प्रथम कॅमेरामध्ये बघून समजून घेण्याचा प्रयत्न करतो, पण जेव्हा तो गाणं ऐकतो तेव्हा त्याने लाजेने आपली मान खाली केली.

वराला पटवणाऱ्या मित्रांचा स्वॅगही अगदी वेगळ्या शैलीत दिसला. या गाण्याचे बोल गाताना वराच्या खांद्यावर हात ठेवून चालणारा मित्र हाताने देखील हावभाव करतो आणि त्याला लग्नानंतर होणाऱ्या परिस्थितीची जाणीव करुन देतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडियावर लोकांना हा व्हिडीओ खूप आवडत आहे. हा व्हिडीओ लव्हदीप कल्याण नावाच्या इन्स्टाग्रामवरुन अपलोड होताच लोकांना या व्हिडीओला खूप उचलून धरले आणि आपल्या मित्राला किंवा ज्याचं लग्न ठरणार आहे किंवा ठरलं आहे अशा लोकांना शेअर केला आहे. इतर अनेक वापरकर्त्यांनी देखील या व्हिडिओवर (इंस्टाग्राम) आपली प्रतिक्रिया दिली आहे.