Jija Sali VIDEO : बहिणीसमोरच मेहुणीसोबत भावोजी Out of Control; पाहणाऱ्यांनी धरलं डोकं

Jija Sali VIDEO : इन्स्टाग्रामवर दर दिवशी शेकड्यानं व्हिडीओ व्हायरल होतात. पण, या व्हिडीओंमध्ये काही असेही असतात जे व्हायरल का झाले हेच कळत नाही. हा व्हिडीओ पाहुन तुम्हालाही असाच प्रश्न पडेल   

Updated: Jan 6, 2023, 10:36 AM IST
Jija Sali VIDEO : बहिणीसमोरच मेहुणीसोबत भावोजी Out of Control; पाहणाऱ्यांनी धरलं डोकं  title=
wedding Jija Sali Video goes Viral people gone crazy

Jija Saali Dance Video: लग्नसोहळा म्हटलं की, प्रत्येक नातेवाईकाचे तालरंग तिथं पाहायला मिळतात. रुसवे फुगवे म्हणू नका, किंवा कोणाची जुळणं म्हणू नका. लग्नसराईच्या दिवसांमध्ये घडणाऱ्या या सर्व गोष्टी आठवणींच्या रुपात जेव्हा समोर येतात तेव्हा अनेकदा आपल्याला आनंद देऊन जातात. किती वेंधळेपणा केलेला ना आपण? असं म्हणत नकतच आपण प्रतिक्रिया देऊनही व्यक्त होतो. लग्नाच्या मांडवात, वधू- वर असलेल्या स्टेजवर नेमकं काय काह होऊ शकतं याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भावोजी आणि मेहुणीमध्ये असणाऱ्या खोडकर नात्याची झलक पाहायला मिळत आहे. 

व्हिडीओमध्ये भावोजी- मेहुणी Out of Control ? 

सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये नवरीबाई राहिली बाजूला, इथं स्टेजवर आलेल्या मेहुणीसोबतच नवरदेव धमाल करताना दिसत आहे. लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये मेहुणीनं ठुमका लगावला असतानाच नवरदेवही तिला टक्कर देताना दिसला. स्वत:च्याच लग्नाच नवरदेवाचा हा झिंगाट डान्स पासून तिथं असणारी नवरी नेमकं काय करावं हे न कळल्यामुळं मध्येच नजर चुकवताना, तर मध्ये डोकं धरताना दिसत आहे. 

नवरीला काय घडतंय हे कळण्याच्या आतच तिथं असणारे पाहुणेही हा सगळा प्रकार पाहून हैराण झाले. तिथे वधू- वरांचे फोटो काढण्यासाठी आलेल्या फोटोग्राफर्सनंही कॅमेरे या मेहुणी आणि भावोजींच्या अफलातून जुगलबंदीच्या दिशेनं वळवले. 

हेसुद्धा वाचा : Viral Video : मित्रांच्या चॅलेंजमुळे भर मांडवात नवरदेवाची फजिती; नवरीला कसं बसं उचलून घेतलं पण...

प्रथमदर्शनी पाहता हा विवाहसोहळा महाराष्ट्रातील नसून, तो उत्तर भारतातील असल्याचं लक्षात येत आहे. इन्स्टाग्रामवर ravi__kumar_rkg या युजर हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत एक लाखाहून अधिक युजर्सनी व्हिडीओ लाईक केला आहे. हा व्हिडीओ पाहून त्यावर नेटकऱ्यांनी तितक्याच भन्नाट Comments केल्या आहेत. 'देख रहा है बिनोद, देश कैसे बरबादीकी ओर बढ रहा है...' इथपासून हे बरे आहेत ना... इथपर्यंतच्या कमेंट इथे पाहायला मिळत आहेत. 'जिजा तो डान्सर निकले' अशी कमेंट करत एका युजरनं या व्हिडीओची खिल्लीही उडवली आहे. तुम्हालाही इन्स्टाग्रामवर स्क्रोल करत असताना असा एखादा व्हिडीओ पाहायला मिळालाय का?