लखनऊ : उत्तर प्रदेशातील लोकसभा पोटनिवडणूकीत झालेल्या दारूण पराभवानंतर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी प्रतिक्रीया दिली आहे. 'आदित्यनाथ म्हणतात, हा जनतेने अप्रत्यक्षपणे दिलेला निर्णय आहे. आम्ही जनतेच्या भावनांचा आदर करतो. पण, उत्तर प्रदेशच्या राजकारणात सौदेबाजी झाली आहे'.
पुढे बोलताना आदित्यनाथ यांनी म्हटले, आम्ही पूर्ण ताकदीने कष्ट केले. पण, बहुदा काही त्रुटी राहिल्या असाव्यात. आम्ही या पराभवाचे आकलन जरूर करू. लोकसभा पोटनिवडणुकीतील निकाल हा आमच्यासाठी मोठा धडा असेल. पोटनिवडणुकीत स्थानिक मुद्दे अधिक प्रभावी पाडतात.
भाजप आणि समाजवादी पक्षाच्या आघाडीवर टीका करताना आदित्यनाथ म्हणाले, यो दोन पक्षांची आघाडी ही राजकीय सौदेबाजी असून, देशाच्या विकासाला खिळ घालण्यासाठी ती तयार झाली आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटले की, आम्हाला हे अनपेक्षीत आहे. आम्हाला अजिबात असे वाटले नव्हते की, बसपाची मते ही समाजवादी पक्षाकडे ट्रान्सफर होतील. पण, आम्ही अभ्यास करू, पराभव का झाला हे तपासू.