रांची: झारखंड (Jharkhand) येथील देवघर येथे झालेल्या रोप वे अपघातामध्ये आतापर्यंत चारजणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सदर दुर्घटनेची माहिती मिळताच अनेक संरक्षण यंत्रणांनी संयुक्तपणे बचावकार्यात योगदान दिलं. अद्यापही हा भीषण अपघात कसा झाला, त्यासाठी जबाबदार कोण या सर्व प्रश्नांची उत्तरं समोर आलेली नाहीत. पण, या अपघाताचा सर्वात पहिला Unseen व्हिडीओ मात्र समोर आला आहे. (Deoghar Ropeway accident)
अपघात झाला त्याक्षणी रोपवेमध्ये असणाऱ्या नागरिकांच्या काळजाचं पाणी झालं. मृत्यू समोर आ वासून उभा असल्याचं त्यांनी पाहिलं. आयुष्याची दोर तुटतेय या भीतीनं ते किंकाळ्या फोडत होते. त्यांनी देवाचा झाला सुरु केला होता.
साधारण मिनिटभराहून काही सेकंद जास्त असणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक इसम हनुमानाच्या नावाचा धावा करताना दिसत आहे.
अपघाताची भीषणताच दाखवणारा हा व्हिडीओ पाहताना मन विचलित होत आहे.
दरम्यान, या अपघातानं संपूर्ण देशालाच जबर हादरा बसला. रविवारी सायंकाळी 6 च्या सुमारास झालेल्या अपघातानंतर 12 ट्रॉलींमध्ये 48 जण अडकले होते. या सर्वांनीच संपूर्ण रात्र या ट्रॉलीमध्ये काढली.
स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रविवारी त्यांना ट्रॉलीमधून खाली उतरवण्यात काही जणांना यश आलं.
मृतकांच्या कुटुंबाला मदतीचा हात
सदर अपघातानंतर झारखंड सरकारनं मृतांच्या कुटुंबीयांसाठी प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. या बचावकार्यामध्ये एक ब्रिगेडियर, दोन कर्नल, 50 जवान आणि वैद्यकिय पथकाची मोलाची मदत झाली. तर, आयटीबीपीच्या 50 जवानांचीही मदत झाली.
देवघर रोपवे हादसे का अनदेखा वीडियो आया सामने....#DeogarhAccident
अन्य खबरों के लिए क्लिक करें - https://t.co/asaJAv45ul pic.twitter.com/3qQZcFpjrz
— Zee News (@ZeeNews) April 13, 2022
ndrf च्या 70 जवानांसोबत वायुदलाची 5 हेलिकॉप्टर आणि 20 जवानांचं पथक रोप वेमध्ये अडकलेल्यांच्या मदतीसाठी धावून गेली होती.