मदरशांमध्ये शिकवणार रामकथा,' उत्तराखंड वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांची माहिती, म्हणाले 'मुलांनी राम व्हावं, औरंगजेब नाही'

वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी म्हटलं आहे की, मदरशात शिकणारी मुलं औरंगजेब नाही तर रामासाठी व्हावी अशी आपली इच्छा आहे. यासाठी वक्फ बोर्डाच्या अभ्यासक्रमात प्रभू श्रीरामाच्या गोष्टीचा समावेश करण्याची चर्चा सुरु आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 26, 2024, 01:24 PM IST
मदरशांमध्ये शिकवणार रामकथा,' उत्तराखंड वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांची माहिती, म्हणाले 'मुलांनी राम व्हावं, औरंगजेब नाही' title=

उत्तराखंड वक्फ बोर्डाशी संबंधित मदरशांमधील अभ्यासक्रमात आता प्रभू श्रीरामाचा समावेश करण्यात येणार आहे. मार्चपासून सुरु होणाऱ्या नव्या सत्रात हा बदल केला जाणार आहे. वक्फ बोर्ड देहरादूनचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी मदरशात शिकणारी मुलं औरंगजेब नाही तर प्रभू श्रीरामासाठी व्हावी अशी आपली इच्छा असल्याचं म्हटलं आहे. 

त्यांनी सांगितलं आहे की, मदरशातील विद्यार्थ्यांनी पैगंबर मोहम्मदसह भगवान श्रीरामाची गोष्टही शिकवली जाणार आहे. अनुभवी मुस्लीम मौलवींनीही या नव्या उपक्रमाला मंजुरी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे शादाब शम्स हे भाजपा नेतेही आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, प्रभू श्रीरामाने शिकवलेली मूल्यं सर्वांनी अनुकरण करण्यासाठी योग्य आहेत, मग धर्म किंवा आस्था कोणतीही असो. 

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वक्फ बोर्डाअंतर्गत 117 मदरसे आहेत. हा नवा अभ्यासक्रम सुरुवातीला देहरादून, हरिद्वार, उधम सिंग नगर आणि नैनिताल जिल्ह्यातील मदरशांमध्ये सुरू केला जाईल. शम्स म्हणाले की, या वर्षी मार्चपासून आमच्या मदरसा आधुनिकीकरण कार्यक्रमाचा भाग म्हणून वक्फ बोर्डाशी संलग्न असलेल्या मदरशांमध्ये श्री रामाचा अभ्यास सुरू केला जाईल. राम वडिलांप्रती आपली बांधिलकी सिद्ध करण्यासाठी सिंहासनाचा त्याग केला आणि वनवासात गेला. असा मुलगा आपला असावा अशी कोणाची इच्छा नसेल?

20 व्या शतकातील मुस्लिम तत्त्ववेत्ता अल्लामा इक्बालचा दाखला देत शम्स म्हणाले की भारताला रामाच्या अस्तित्वाचा अभिमान आहे, लोक त्यांना इमाम-ए-हिंद मानतात. सुखसोयी सोडून प्रभू रामाच्या मागे वनवासात गेलेले लक्ष्मण आणि सीता हेदेखील अत्यंत प्रेरणादायी आहेत.