मुंबई : पुढील सुट्ट्यांसाटी बुक केलेले तुमचे तिकीट वेटिंग लिस्टमध्ये आहे का? जर असेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही वेटिंगमध्ये असलेले तुमचे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता आहे.
प्रसिद्ध यात्रा पोर्टल रेलयात्रीच्या एका रिपोर्टमधून ही माहिती समोर आलीये. रिपोर्टनुसार, २०१५च्या दिवाळी सुट्टीदरम्यान कन्फर्म न झाल्याने वेटिंग लिस्टमधील २५.५ टक्के तिकीटे रद्द करण्यात आली. २०१६ आणि २०१७ मध्ये हे प्रमाण १८ टक्के होते. यावरुन स्पष्ट होते की वेटिंग लिस्टच्या ऐवजी कंफर्म तिकीटाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झालीये.
गेल्या वर्षीच्या तुलनेत वेटिंग लिस्टची संख्या घटलीये. माहितीसाठी कोटा-पाटणा एक्सप्रेसमध्ये वेटिंग लिस्ट ८१३वरुन कमी करुन ७३५ वर आणण्यात आलीये.
रेलयात्रीचे सह संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष राठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दर वर्षी दिवाळीला मोठ्या प्रमाणात बुकिंग होते. अनेकदा लोकांना वेटिंग लिस्टमधील तिकीट घेऊन प्रवास करावा लागतो. या वर्षी आधीच्या तुलनेत लोकांचे तिकीट रद्द करण्याचे प्रमाण मात्र घटले.