अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज (बुधवार 29,नोवेंबर) मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. गुजरातमध्ये 9 आणि 14 अशा दोन टप्प्यात होत असलेल्या मतदानासाठी कर्तव्य बजावणाऱ्या सुरक्षा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आज आपले मतदान केले.
शांतता आणि सुव्यवस्थेत मतदान पार पडावे यासाठी निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात सुरक्षा कर्मचाऱ्यांची ड्यूटीही निश्चित करण्यात आली आहे. प्रत्यक्ष मतदान आणि निवडणूक कालावधीत शांतता आणि सुव्यवस्थेसाठी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनाही आपला मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाने विशेष काळजी घेतली. त्यासाठी या कर्मचाऱ्यांना आजच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. या कर्मचाऱ्यांनी केलेल्या मतदानाची मोजणीही 18 डिसेंबरला केल्या जाणाऱ्या मतमोजणीसोबत होणर आहे.
सुरक्षाकर्मचाऱी आणि अधिकाऱ्यांनी रांगेत उभा राहून मतदान केले. भरूच डेडक्वार्टमध्ये हे मतदान पार पडले. मात्र, सर्वच कर्मचाऱ्यांना हेडक्वार्टरला येऊन मतदान करणे शक्य नसल्यामुळे विविध ठिकाणी मतदान केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली होती. मतदानासाठी बॅलेट पेपरचा वापर करण्यात आला. कोणत्याही निवडणूकीत सुरक्षा कर्मचारी पहिल्यांदा मतदान करतात. याही निवडणुकीत सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पहिल्यांदा मतदान केले.
गुजरातमध्ये दोन टप्प्यांत निवडणूक पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 9 डिसेंबरला (89 विधानसभा जागा) तर, 14 डिसेंबरला (93 विधानसभा जागा ) दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडणार आहे. गुजरातसोबतच हिमाचल प्रदेशमध्येही निवडणुका होत आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यांतील निवडणुकीची मतमोजनी 18 डिसेंबरला होणार आहे. गुजरात निवडणुकीसाठी 50,128 पोलिंग बूथ बनविण्यात आले आहेत. गोवा नंतर हिमाचल प्रदेश आणि गुजरात ही दोन राज्ये अशी आहेत. ज्यात व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जात आहे.