... जेव्हा रातोरात एका व्यक्तीच्या बॅंक अकाऊंटमध्ये ९९ कोटी येतात

एका रात्रीत तुमच्या बॅंक अकाऊंटमध्ये ९९ कोटी रूपये  ट्रान्सफर झाल्याचं कळलं तर?  ..

Updated: Nov 18, 2017, 02:54 PM IST
... जेव्हा रातोरात एका व्यक्तीच्या बॅंक अकाऊंटमध्ये ९९ कोटी येतात  title=

पटणा : एका रात्रीत तुमच्या बॅंक अकाऊंटमध्ये ९९ कोटी रूपये  ट्रान्सफर झाल्याचं कळलं तर?  ..

काहींना या गोष्टीमुळे आनंद होऊ शकतो तर काही जणांना घाम फुटेल.. 

बिहारशरीफ येथील शेखपुरामधील घाटकुसुंभात असेच काहीतरी झाले आहे. विष्णूदएव यादव यांच्यासोबत असेच काही घडले आहे. एसबीआय बॅंकेतील या खातेदारकांसोबत असे झाले आहे.  
 
 अचानक खात्यामध्ये ९९ कोटी ९५ लाख ६७ हजार  ७० रूपये त्यांच्या बॅंक अकाऊंट आल्यानंतर कोणत्याही कायदेशीर कारवाईमध्ये अडकू नये म्हणून त्यांनी बॅंक मॅनेजरकडे धाव घेतली. 
 
मोबाईलवर विष्णूदेव यांना मेसेज आला होता.त्यानंतर मिनी सेटमेंटनेदेखील त्यांनी हे तपासुन पाहिले. तर 16 नोव्हेंबरला  ही रक्कम जमा झाल्याचे त्यांना दिसले. 
 
 बॅंक मॅनेजरने मात्र या गोष्टीला नकार दिला आहे. हा केवळ तांत्रिक बिघाडामुळे झालेला प्रकार असल्याचे म्हटले आहे. संबंधित खात्याची चौकशी सुरू असल्याची माहिती दिली आहे. 
 
विष्णूदेवांनी मात्र आधी ५०,००० आणि आता अचानक ९९ कोटींची रक्कम येते. हा प्रकार संदिग्ध असल्याचं म्हटले आहे. या प्रकरणी चौकशी केली जावी असा विष्णूदेव यांचा आग्रह आहे.