होळीच्या Reel मध्ये साडी नेसून स्टंटबाजी करताना घडला भलताच प्रकार! 'तो' Video Viral

Viral Video Holi Special Reel Went Wrong: या व्हिडीओला हजारोंच्या संख्येनं व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले असले तरी अनेकांनी या व्हिडीओवरुन स्टंटबाजी करणाऱ्या तरुणीला सुनावल्याचं पाहायला मिळत आहे. काहींनी याला वेडेपणा म्हटलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 21, 2024, 11:03 AM IST
होळीच्या Reel मध्ये साडी नेसून स्टंटबाजी करताना घडला भलताच प्रकार! 'तो' Video Viral title=
हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे

Viral Video Holi Special Reel Went Wrong: सध्याचा जमाना हा रिल्सचा आहे. रिलच्या माध्यमातून रातोरात प्रसिद्धी मिळवण्याच्या उद्देशाने अनेकजण छोटेछोटे व्हिडीओ बनवत असतात. त्यातही बरेचजण काहीतरी भन्नाट स्टंटबाजी करत रिल्स शूट करतात. पण वेगळेपणाच्या नादात केलेली अशी कृती धोकादायक ठरु शकते. असाच एक विचित्र व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमधून कारण नसताना भलतं धाडस करणं जीव धोक्यात घालणारं ठरु शकतं, असं अधोरेखित होत आङे. या व्हिडीओमध्ये होळी आणि धुलवडीच्या पार्श्वभूमीवर भन्नाट रिल बनवण्याच्या प्रयत्नात साडी नेसून स्टंटबाजी करत आहे. मात्र हा स्टंट संपेपर्यंत असं काही होतं की सर्वांनाच तिची मदत करावी लागते.

व्हिडीओमध्ये काय आहे?

या व्हिडीओमध्ये एक तरुणी नारंगी रंगाची साडी, पायात स्पोर्ट्स शूज अशा लूकमध्ये दिसत आहे. पोल फ्रेमवर लटकून ही तरुणी स्टंटबाजी करताना दिसतेय. ही स्टंटबाजी करताना मुलीच्या बुटांना सेलोटेपने कलर पॉप अप चिटकवल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये या कलर पॉप अपला आग लागवल्यानंतर त्यामधून रंगीत धूर बाहेर पडू लागतो. बुटांमधून रंगीत धूर बाहेर पडतानाच ही तरुणी बागेतील पोलवर हातांच्या मदतीने गोल गोल फेऱ्या घेताना दिसते. स्टंट करताना बुटांना लावलेल्या पॉप अपमधून निघणारे रंग फारच सुंदर दिसतात यात शंका नाही. मात्र हा व्हिडीओ शूट करुन झाल्यानंतर या तरुणीच्या मनाप्रमाणे या स्टंटचा शेवट झाला नाही. 

स्टंटबाजीनंतर खरा गोंधळ

स्टंट शूट करुन झाल्यानंतर ही तरुणी खाली उतरते तेव्हा तिच्या बुटांजवळ चिटकवलेल्या पॉप अपला लावण्यात आलेली आग विझण्याऐवजी तिच्या साडीचा फॉल पेट घेतो. ही तरुणी उड्या मारुन आग विजवण्याचा प्रयत्न करते. मात्र आग विजत नसल्याने महिलेच्या मदतीला आजूबाजूचे लोग धावतात. तरीही ही महिला उड्या मारताना दिसते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shalu Kirar (@shalugymnast)

लोक म्हणतात, असा वेडेपणा केला तर...

अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. साडीला आग लागेल असं या तरुणीला वाटलंही नसतं. 12 मार्च रोजी शेअर केलेल्या व्हिडीओला 86 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. काहींनी तर या व्हिडीओमध्ये व्हायरल होण्यासारखं काय आहे असा प्रश्न विचारला आहे. आग लागल्याने संपूर्ण स्टंटबाजी एका क्षणात नाहीशी झाली, असं अन्य एकाने म्हटलं आहे. असे वेड्यासारखे व्हिडीओ बनवले तर असाच काहीतरी प्रकार होणार, अशी खोचक प्रतिक्रिया अन्य एकाने नोंदवली आहे.