Viral Video : शेतात अचानक भांडू लागल्या महिला.... अखेर असं संपलं भांडण...

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला शेताबाहेर ठेवलेल्या खाटेवर बसलेली असते, मग...

Updated: Aug 26, 2021, 03:55 PM IST
Viral Video : शेतात अचानक भांडू लागल्या महिला.... अखेर असं संपलं भांडण... title=

मुंबई : जर तुम्हाला असे वाटत असेल की, मारामारी फक्त पुरुषांमध्ये होते तर तुम्ही चुकीचे आहात. काही स्त्रिया एकमेकांशी भयंकर पद्धतीने लढतात. त्यात ते एकमेकांचे केस ओढतात, त्यांना लाथा-बुक्की घालतात, चपलीने मारतात. सध्या सोशल मीडियावर असाच महिलांच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन महिला एकमेंकांशी भांडताना दिसत आहेत. त्या दोघीही कोणापेक्षा कमी कमी नाही.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला शेताबाहेर ठेवलेल्या खाटेवर बसलेली असते. मग दुसरी महिला तिथे येते आणि तिला मारहाण करायला लागते. व्हिडीओचे लोकेशन, महिलांचे ड्रेस आणि हॅशटॅग पाहून हा व्हिडीओ पंजाब किंवा त्याच्या आसपासच्या भागातील असल्याचे तुम्ही म्हणू शकता.

व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या दोन्ही महिला खूप दबंग आहेत. दोघेही त्यांच्या भांडणात कोणताही कसर सोडत नाहीत. मारामारी करताना नंतर अशी परिस्थिती येते की, दोघेही खाटेवर एकमेकांना आडवे करुन, एकमेकांना हाता -पायाने मारत आहेत. शेवटी, अचानक दोघेही हसायला लागतात आणि एकमेकांना सोडून जातात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओमध्ये कुठेतरी मोठ्या शूटिंग कॅमेऱ्याची झलक दिसते. ते पाहून, असा अंदाज लावला जात आहे की, ही व्हिडीओ क्लिप कदाचित एखाद्या चित्रपटाच्या शूटिंगचा भाग आहे. परंतु हा व्हिडीओ पाहून लोकांनी त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.