Vijaya Diagnostic IPO | 1 सप्टेंबरला खुला होणार IPO; दमदार कमाईसाठी तयार रहा

 डायग्रोस्टिक चैन विजया डायग्रोस्टिक सेंटर्सने आपल्या IPO साठी प्राइस बॅंड निश्चत केले आहेत.

Updated: Aug 26, 2021, 03:02 PM IST
Vijaya Diagnostic IPO | 1 सप्टेंबरला खुला होणार IPO; दमदार कमाईसाठी तयार रहा title=

मुंबई  : डायग्रोस्टिक चैन विजया डायग्रोस्टिक सेंटर्सने आपल्या IPO साठी प्राइस बॅंड निश्चित केले आहेत. कंपनीने यासाठी 522-531 रुपये प्रति शेअर प्राइस बॅंड निश्चित केले आहे. अप्पर प्राइज बॅंडवर 1895 कोटी रुपये उभारण्याचे कंपनीचे नियोजन आहे. विजया डायग्नोस्टिकचा IPO पुढच्या आठवड्यात 1 सप्टेंबला खुला होणार. यामध्ये 3 सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करता येईल. हा आयपीओ पूर्णतः एक ऑफर फॉर सेल (OFS) आहे. 

विजया डायग्नोस्टिकचे फ्रेश इक्विटी शेअर जारी करण्यात येणार नाही. हा आयपीओ पूर्णतः OFS असणार आहे. ज्यामध्ये 3 कोटी 56 लाख इक्विटी शेअर विकले जातील. IPOचे प्रमोटर एस सुरेंद्रनाथ रेड्डी आणि गुंतवणूकदार कराकोरम लिमिटेड आणि केदारा कॅपिटल ऑल्टरनेटिव इनवेस्टमेंट फंडच्या वतीने 35 टक्के हिस्सेदारी विकण्यात येईल. डॉ. एस  सुरेंद्रनाथ रेड्डी 40.95 लाख शेअर्स आणि कराकोरम लिमिटेड 2.95 कोटी इक्विटी शेअर्स विकतील. 

IPOमध्ये 50 टक्के हिस्सा इंस्टिट्युशनल बायर्सचा असणार आहे. 35 टक्के हिस्सा रिटेल इनवेस्टर्ससाठी रिझर्व ठेवण्यात येणार आहे. उर्वरित 15 टक्के नॉन इंस्टिट्युशनल बायर्ससाठी रिझर्व असेल. 1.5 लाख इक्विटी शेअर्स कर्मचाऱ्यांसाठी रिझर्व असतील.