Viral Video : पोपटाला भुंकताना तुम्ही कधी पाहिलंय का? सगळीकडे 'या' पोपटाचीच चर्चा

viral video: पोपट आणि कुत्रा खेळत होते, कुत्रा झोपला पण पोपटाने त्याला उठवण्यासाठी अशी काही शक्कल लढवली की, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा म्हणाल अरे आवरा याला... 

Updated: Jan 27, 2023, 03:53 PM IST
Viral Video : पोपटाला भुंकताना तुम्ही कधी पाहिलंय का? सगळीकडे 'या' पोपटाचीच चर्चा title=

Viral video:  सोशल मीडियावर (viral video) व्हायरल होणाऱ्या व्हिडिओची कमी नाहीये. एखादा हटके व्हिडीओ किंवा पोस्ट असेल तर एका रात्रीत वाऱ्यासारखी पसरते. सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पाहिले जातात शेअर केले जातात.

यातले बरेच व्हिडीओ खूप हसवणारे असतात. (funny video on social media) तर काही व्हिडीओ प्राण्यांचे असतात. प्राण्यांचे व्हिडीओ नेटकरी आवडीने पाहतात आणि आवडल्यास शेअर करतात.  

सध्या सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय तो पाहून आतापर्यंत भरपूर कॉमेंट्स येऊ लागल्या आहेत. बऱ्याच जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, आणि मोठ्या प्रमाणात शेअरसुद्धा केला आहे. तुम्हीसुद्धा हा व्हिडीओ पाहाल तर तुमच्याही चेहऱ्यावर क्युट स्माईल आल्याशिवाय राहणार नाही. 

पाळीव प्राण्यांमध्ये सर्वात जास्त माणसाळणारा प्राणी म्हणजे कुत्रा. सर्वात इमानदार आणि विश्वासू  प्राणी म्हणून कुत्र्याकडे पाहिलं जात. अत्यंत माणूसलोभी असणारा हा प्राणी खूप लवकर आपल्या घरात  मिसळतो. माणसंच काय तर, इतर प्राण्यांसोबतही कुत्रा लवकर गट्टी करतो. 

कुत्रा आणि त्याच्या एका खास मित्राचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.  सगळीकडे सध्या याच व्हिडिओची तुफान चर्चा आहे. 

आपल्यापैकी बऱ्याच जणांसोबत असं एकदा तरी घडलेलंच असतं, की जेव्हा आपण आपल्या एखाद्या खास मित्रासोबत खूप वेळ राहतो आणि त्याच्यासारखी एखादी कृती करतो मग लगेच आपले पालक आपल्याला टोमणा मारतात की , 'त्याच्यासोबत राहून वाण नाहीतर गुण लागलाच.'  

आता आपण ज्या व्हायरल व्हिडीओविषयी बोलतोय त्यातही असच काहीस घडताना दिसत आहे. जो व्हिडीओ व्हायरल होतोय त्यात आपण पाहू शकता एक कुत्रा आणि पोपट आहेत. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. कुत्र्यासोबतच्या मैत्रीचा परिणाम पोपटावर झाल्याचं

व्हिडिओमध्ये दिसतोय. आता तुम्ही म्हणाल असं नेमकं काय केलंय त्याने.  सर्वाना हे तर माहीतच आहे, पोपट हा पक्षी आपण सांगू तस बोलू शकतो. आपण जर शिकवलं तर उत्तमरीत्या बोलतो. दुसऱ्यांच्या बोलण्याची नक्कल करण्यात पोपट एक्सपर्ट असतो. म्हणूनच तर एखादा कोणी खूप बोलत असेल तर आपण म्हणतो ना कि 'पोपटासारखा बोलू नको' .. (viral parrot video)

नेमका काय प्रकार 

व्हिडीओ नीट ऐका, आणि पाहा..यात एक कुत्रा झोपलाय आणि पोपट त्याच्या अवतीभवती फिरतोय त्याला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला उठवताना पोपट चक्क कुत्र्यासारखा भुंकतोय. व्हिडीओ पाहून  तुम्हालाही हसू आवरणार नाही. पण व्हिडीओ पाहता दोघांमध्ये चांगलीच मैत्री असल्याचं दिसतंय.