Viral News: ट्रॅकवर झोपलेला तरुण, समोरुन वेगाने येणारी ट्रेन अन् RPF जवानाने मारलेली उडी; पाहा धक्कादायक VIDEO

Viral News: रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. रेल्वे येताच तो ट्रॅकवर जाऊन झोपला होता. पण त्याचवेळी आरपीएफ (RPF) जवानाने ट्रॅकवर उडी मारली आणि त्याचे प्राण वाचवले. आरपीएफने या घटनेचं सीसीटीव्ही (CCTV) शेअर केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 11, 2023, 04:14 PM IST
Viral News: ट्रॅकवर झोपलेला तरुण, समोरुन वेगाने येणारी ट्रेन अन् RPF जवानाने मारलेली उडी; पाहा धक्कादायक VIDEO title=

Viral News: रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. आत्महत्या करण्याच्या हेतूने रेल्वे स्थानकावर पोहोचलेल्या एका व्यक्तीने ट्रेन येताच ट्रॅकवर उडी मारली होती. पण त्याचवेळी आरपीएफ (RPF) जवानाने ट्रॅकवर उडी मारली आणि त्याचे प्राण वाचवले. आरपीएफने या घटनेचं सीसीटीव्ही (CCTV) ट्विटरला शेअर केलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

व्हिडीओत एख व्यक्ती रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर उभा असल्याचं दिसत आहे. रात्रीची वेळ असल्याने स्थानकावर जास्त वर्दळ नव्हती. यावेळी तो वारंवार ट्रेन येत आहे का हे पाहत असतो. दरम्यान, विरुद्ध दिशेने एक ट्रेन येत असल्याचं दिसताच तो ट्रॅकवर जाऊन झोपतो. आत्महत्या करण्याच्या हेतून तो ट्रॅकवर आपलं डोकं ठेवतो. पण याचवेळी आरपीएफ कॉन्स्टेबल के सुमथी हे सर्व दृष्य पाहतात. 

क्षणाचाही विलंब न करता के सुमथी ट्रॅकवर उडी मारतात आणि त्याला मागे खेचतात. सुमथी यांची मदत करण्यासाठी प्लॅटफॉर्मवरील आणखी दोघं धाव घेत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. यानंतर हे सर्वजण त्याला रोखतात. यादरम्यान ट्रेन शेजारुन वेगाने जाताना दिसत आहे. पुरवा मेदीनीपूर रेल्वे स्थानकात हा सगळा प्रकार घडला आहे. 

आरपीएफने व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे की, "लेडी कॉन्स्टेबल के सुमथी यांनी पुरवा मेदीनीपूर रेल्वे स्थानकात ट्रेन वेगात जाणार त्याच्या काही क्षण आधी निर्भयपणे व्यक्तीला ट्रॅकवरुन मागे खेचलं. त्यांच्या या वचनबद्धतेला सलाम". 

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आरपीएफ कॉन्स्टेबलचं कौतुक केलं आहे. प्रवाशाचा जीव वाचवल्याबद्दल अनेकांनी तिच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. एका युजरने लिहिलं आहे की, "कामासाठी चांगलं समर्पण आहे, अभिनंदन." 

"त्वरित प्रतिक्रियेबद्दल तिचं अभिनंदन, परंतु मला त्या गरीब व्यक्तीबद्दल खूप वाईट वाटत आहे ज्याने आपला जीव देण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी अनुभव घेतला आहे त्यांना तुमच्या आजूबाजूला इतके लोक असतानाही एकटे राहणे किती कठीण आहे हे समजू शकतात. आयुष्य त्याच्याशी चांगलं वागेल अशी आशा,” असं एका युजरने मह्टलं आहे.

"हृदयस्पर्शी व्हिडिओ, कॉन्स्टेबल सुमती यांचं अभिनंदन. शूर मुलगी," असं एका तिसऱ्या युजरने लिहिलं आहे. तर एकाने What a hero असं म्हटलं आहे. "सुमंती यांचे अभिनंदन," असं एकाने लिहिलं आहे.