मुलगी फाटलेल्या जीन्सवर पोहोचली कॉलेजला, भर वर्गात टीचरने केलं असं काही, पालक आले धावत

कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी कोणते कपडे परिधान करावेत यावरुन सोशल मीडियावर वाद रंगला आहे. निमित्त ठरलं आहे हे सोशल मीडियावर व्हायरल होणारं हे प्रकरण

Updated: Feb 22, 2023, 01:42 PM IST
मुलगी फाटलेल्या जीन्सवर पोहोचली कॉलेजला, भर वर्गात टीचरने केलं असं काही, पालक आले धावत title=

Trending News : शालेय जीवनात विद्यार्थ्यांना  (Student) गणवेश परिधान करावा लागतो.  कॉलेज (College) जीवनात मात्र विद्यार्थी आपल्या फॅशनची (Fashion) आवड पूर्ण करतात. पण कॉलेजला जातानाही कपडे परिधान करण्याची एक मर्यादा असते. मॉडर्न फॅशन (Morden Fashion) करून येणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. पण, सध्याचा फॅशन ट्रेंड (Fashion Trend) बघता बहुतांश प्रकारचे कपडे हे कॉलेजेस लागू केलेल्या ड्रेसकोडच्या (DressCode) नियमात बसत नाहीत. असाच एक प्रकार एका महाविद्यालयात घडला. ज्याची सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच चर्चा रंगली आहे. 

कॉलेजने केली कारवाई
कॉलेजमध्ये एक मुलगी सध्या ट्रेंडमध्ये असलेली फॅशन करुन गेली. या मुलीने फाटलेली जीन्स (Ripped Jeans) परिधान केली होती. भर वर्गात अशी फॅशन करुन आल्याने सर्व वर्गाचं लक्ष तिच्यावर होतं. वर्गातील प्राध्यापकांनी (Professor) देखील या फॅशनवर आक्षेप घेतला. इतकंच नाही प्राध्यापकांनी चिकटपट्टी (Tape) आणून तिच्या फाटलेल्या जीन्सला लावली. पण हे प्रकरण इतक्यावरच थांबलं नाही. त्या मुलीने वर्गात घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. मुलीबरोबर घडलेल्या प्रकाराने तिची आई संतापली. तीने एक व्हिडिओ बनवत सोशल मीडियावर हा शेअर केला आणि कॉलेजच्या कारवाईबद्दल सवाल उपस्थित केला.

आपल्या मुलीच्या कपड्यांना आणि त्वचेला चिकटपट्टी चिटकवणं हे कॉलेजच्या नियमात बसतं का? असा जाब मुलीच्या आईने विचारला आहे. तसंच आपल्या मुलीच्या त्वचेला चिकटपट्टीमुळे काही जखम झाल्यास त्याला कॉलेज जबाबदार राहाणार का असा सवाल ही तिने उपस्थित केला आहे. वर्गात प्राध्यापक मुलीच्या जीन्सला चिकटपट्टी चिटकवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्राध्यापकाची तक्रार मुलीच्या आईने कॉलेज व्यवस्थापनाकडे केली आहे. 

सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ
मुलीच्या आईने कॉलेजमध्ये जाऊन कॉलेज व्यवस्थापनाला जाब विचारला आहे. घडलेल्या प्रकाराने आपल्या मुलीची बदनामी झाली असून याप्रकरणी प्राध्यापकावर कारवाई करावी अशी मागणी मुलीच्या आईने केली आहे. मुलीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. 

सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया
या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही युजर्सने त्या मुलीच्या आईची बाजू घेतली आहे. प्राध्यापकाने कारवाई करण्याआधी त्या मुलीच्या पालकांना फोन करुन समज द्यायला हवी होती असं काही युजर्स म्हणत आहेत, काही युजर्सच्या मते प्राध्यापकावर कारवाई होणं गरजेचं आहे. तर काही युजर्सने मुलीच्या आईला सुनावलं आहे. युजर्सच्या मते आपल्या पाल्यांनी फॅशनच्या नावाखाली कोणते कपडे घालावेत याचं भान पालकांनी ठेवलं पाहिजें असं म्हटलं आहे. तर काही युजर्सने कॉलेजला जाब विचारण्याआधी आपल्या मुलीला समज देण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. 

काय आहे कॉलेजची नियमावली
दुसरीकडे कॉलेजने स्पष्टीकरण देताना नियमावली दाखवली आहे. विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये येताना व्यवस्थित कपडे घालवेत असं म्हटलं आहे. तसंच कपड्यांमधून अंतर्वस्त्र दिसू नयेत असे कपडे विद्यार्थ्यांनी घालू नये असंही या नियमावलीत सांगण्यात आलं आहे.