viral video: आजकाल लोकं रस्त्यावरून चालताना बरीच काळजी घेत असले तरी लोकं रस्त्यावर वाहनं नीट चालवताना (road safety) दिसत नाहीत. अनेकदा दारूच्या (beer) नशेत तर कधी बेभान होत वाहनं चालवताना दिसतात त्यामुळे अपघात (accidents) होणंही साहजिकच उद्भवते. त्यामुळे अशाप्रसंगी पोलिस लोकांना कितीही सतर्क करत असले तरी मात्र लोकं वाहूतकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करतात आणि नियमांचा भंग करतात अशावेळी लोकांनी भान ठेवणे आवश्यक असते परंतु सध्या असे चित्रही फार कमी दिसते. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार (shocking video) समोर आला आहे. सध्या एक व्हिडीओ चांगलाच चर्चेचा ठरला आहे. एका बाईकवर एक नाही, दोन नाही, तीन नाही वा चार नाही चक्क पाच लोकं एकाच बाईकवर बसून स्टंटबाजी (bike stunt) करताना दिसले. (viral video five men ride on bike doing dangerous stunt goes viral up police)
समोर आलेल्या व्हिडीओतून (video) समजते की ही पाच जण एकाच बाईकवर बसून जाताना दिसत होते तेव्हा त्यांना पोलिसांना झापलं. हे पाच जणं बाईकवरून जाताना अत्यंत वाईट पद्धतीनं स्टंटबाजी करताना दिसले. त्यामुळे असा भयानक स्टंटबाजी करणं त्यांना फारच महागात पडलं आहे. एक माणूस पुढच्या बाजूला बसून बाईक चालवताना दिसला तर त्याच्या पाठी दोन इसम बसले होते आणि त्यातील मध्ये बसलेल्या एका माणसाच्या मांडीवर दोन जण बसलेले पाहायला मिळाले. एक एका बाजूला तर दुसरा दुसऱ्या बाजूला बसला होता. तरी दोघंही जण अत्यंत विचित्रपणे त्या बाईकवर बसले होते आणि त्याची त्यांना अजिबात काळजी नव्हती की कसलं टेन्शन (tension) दिसतं नव्हतं. ते मजेत बाईकवरून चालत होते.
त्यामुळे हा व्हिडीओ (video) सगळीकडे व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही असा स्टंट करू नका कारण असे स्टंट करणं हे जीवावर बेतू शकतं. ही घटना उत्तरप्रदेशातील आहे. पोलिसांनी या पाचही जणांवर गुन्हा दाखल केला आहे आणि त्यांच्यावर व्हेयेकल एक्टद्वारे 6500 रूपयांचा दंड ठोठावला आहे. सध्या ही मंडळी तुरूंगात असल्याचे बोललं जात आहे.
Hi @UPPViralCheck FYI pls.
How many people can ride a bike?
You might suggest one or two, but this scene from Moradabad in Uttar Pradesh proves that as many as five can fit on one!
Warning: this is not safe, so we do not advise you try it.
via Sputnik news, Russia pic.twitter.com/IrOr7ZjjoF— Bhavika Kapoor (@bhavi_kap) November 29, 2022
पोलिसांनी सांगितलं की सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये कोतवाली पोलिस स्टेशन (police station) परिसरात पाच जण मोटरसायकलवरून जाताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये मोटारसायकलची नंबरप्लेट दिसत असून ओळख पटल्यानंतर कारवाई करण्यात आली. मोटारसायकल (motorcycle) जप्त करण्यात आली असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, ही मोटरसायकल रईस अहमद नावाच्या व्यक्तीची होती. आरिफ, आसिफ, इर्शाद, शमीम आणि वसीम अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व मुरादाबादमधील असलतपुरा भागातील रहिवासी आहेत.