मुंबई : 'जीते हैं एक बार, मरते हैं एक बार, प्यार होता हैं एक बार और शादी.... वो भी एक ही बार...', असे डायलॉग अनेकदा आपण चित्रपटांच्या निमित्तानं ऐकले आहेत. काहींनी खऱ्या आयुष्यातही त्याचा अवलंब केला आहे. मुळात अवलंब करणाऱ्यांची संख्या जास्तही आहे. पण, यात काही मंडळी अशीही आहेत, ज्यांनी अनेकदा विवाहबाह्य प्रेमसंबंध किंवा तत्सम नाती जपत वादांना खतपाणी घातलं आहे. अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (VIRAL video Cheating husband meets girlfriend during jogging caught by wife )
पती सकाळी जॉगिंगला आला असता तिथं त्याला प्रेयसी भेटते. त्याचवेळी या व्यक्तीची पत्नी तिथं पोहोचते आणि बस्स, मग काय... 'अच्छा तो ये जॉगिंग हो रही हैं...' असं म्हणत पत्नी पतीची शाळा घेण्यात सुरुवात करते. नेमकं तेव्हाच पती त्या ठिकाणहून पळ काढतो. बरं असा तसा नाही तर तो धूम ठोकून पळतो. पत्नीचं बोलणं पाहता तिचा पती रोज जॉगिंगच्या बहाण्यानं जाऊन त्याच्या प्रेयसीला भेटतो. त्याच्या या करामती पाहून, आता ये तू घरी मी बघतेच तुला अशाच काहीशा रुद्रावतारात ती पतीला खडसावत असल्याचं पाहायला मिळत आहे.
पती - पत्नीमध्ये या एका मुद्द्यावरुन बराच मोठा वाद होणार यात शंकाच नाही. पण, पत्नीमला फसवून अशा वेगळ्या वाटांवर जाणाऱ्यांनो वेळीच सावध व्हा नाहीतर तुमचीही खैर नाही. शिवाय पतीचे विवाहबाद्य प्रेमसंबंध असल्याची शंका असणाऱ्या महिलांना, सावधान! तुम्ही कल्पनाही करू शकत नाही त्या वेळेत सापडेल तुम्हाला नवऱ्याची गर्लफ्रेंड....