मुंबई : लोकांना आपल्या घरी प्राणी किंवा पक्षी पाळण्याची सवय असते. ज्यामुळे ते घरी कुत्रा, मांजर किंवा पोपट वैगरे पाळतात. परंतु आपल्यापैकी काही अशी लोकं आहेत ज्यांना पाळीव प्राणी पाळायला आवडत नाही किंवा आपल्यापैकी काही लोकं अशी असतात ज्यांना मांजर देखील आवडत नाही. परंतु असं असेल तर, सोशल मीडियावरील हा व्हिडीओ तुम्ही नक्की पाहा. तुमचं मन नक्की बदलेल.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मांजरीच्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, कसं आपल्या समजुतीने लहान मुलाचा जीव वाचवला आहे. याचे एक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण मांजरीचे कौतुक करत आहे. जरी, हा व्हिडीओ जुना आहे परंतु ट्विटरवर तो पुन्हा व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान मूल गुडघ्यांवर चालत आहे, तर एक मांजर पलंगावर बसलेली दिसत आहे. थोड्याच वेळात हे लहान बाळ पायऱ्यांकडे जाऊ लागते. मांजर तरीही त्या पलंगावर बसलेली असते. परंतु जेव्हा हे लहान बाळ पायऱ्यांजवळ पोहोचते, तेव्हा मांजर लगेच त्याच्या समोर उडी मारते आणि मुलाला मागे ढकलते आणि त्याला तिथून दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. व्हिडीओ पाहून तुमच्या हे लक्षात येईल की, जर मांजर योग्य वेळी तिथे पोहोचली नसती तर हे बाळ पायऱ्यांवरुन खाली पडलेच असते.
18 सेकंदांची व्हिडिओ क्लिप Twitter aflyguynew1 नावाच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया वापरकर्त्यांना खूप आवडला आहे. 23 सप्टेंबर रोजी ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत 90 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. तर जवळपास 5 लाख लोकांनी त्याला लाईक केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हजारो लोकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
Cat saves baby from falling down the stairs pic.twitter.com/mHpJhnJ69e
— Lars (@aflyguynew1) September 22, 2021
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर, बहुतेक वापरकर्ते मांजरीचे कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ही मांजर आश्चर्यकारक आहे, तर दुसऱ्याने लिहिले की मला मांजरींची फार आवड नव्हती, पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मी सुद्धा त्यांच्या प्रेमात पडलो आहे.