Bihar Groom Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओत वऱ्हाडी नवरदेवाची (Bald Groom Video) चांगलीच धुलाई करताना दिसत आहेत. याचे कारणदेखील भन्नाट आहे. नवरदेवाचे हे दुसरे लग्न होते. लग्नासाठी नवरदेव नवरीच्या घरी पोहोचला मात्र आयत्यावेळी त्याचे बिंग फुटले आणि एकच गोंधळ उडाला. नवरदेवाचे एक सत्य समोर येताच नवरीच्या नातेवाईकांनी त्याला बेदम मारहाण केली आहे. सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर होत आहे. तर, नवरदेव हात जोडून माफी मागत असल्याचंही या व्हिडिओत दिसत आहे. काय घडलं नेमकं जाणून घेऊया. (Husband Wife Viral Video)
बिहार जिल्ह्यातील बजौरा गावात ही घटना घडली आहे. नवरदेव इकबाल नगर येथील रहिवाशी आहे. त्याचं हे दुसरं लग्न गोतं. मात्र, लग्न करण्यासाठी तो विग (नकली केस) लावून वावरत होता. लग्न ठरवतानाही त्याने हि गोष्ट नवरीला सांगितली नाही. मात्र, लग्नाच्या मांडवातच ही गोष्ट उघड झाल्याने वधूपक्षातील मंडळी संतापली. नवऱ्याने त्याला टक्कल पडलं होतं ही बाब लपवून ठेवल्याचा आरोप करत नवरदेवाला घेरले. तर, त्याला बेदम मारहाणदेखील केली. हा व्हिडिओ एका व्यक्तीने ट्विटरवर शेअर केला आहे.
नवरदेव लग्नासाठी मांडवात आला असताना वारंवार त्याच्या केसाला हात लावत होता. त्यामुळं वधुपक्षाकडील काही जणांना संशय आला. त्यामुळं त्यांनी नवरदेवाला जाब विचारला. तेव्हा त्याने काहीच उत्तर दिलं नाही. तेव्हा एका व्यक्तीने केस ओढताच विग हातात आला आणि नवरदेवाला टक्कल असल्याचं समोर आले. त्यानंतर लग्नघरात एकच गोंधळ निर्माण झाला. नवरीच्या कुटुंबीयांनी रागाच्या भरात नवरदेवाला चांगलंच बदडून काढलं आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, वधुपक्षाकडील लोक नवरदेवाला वारंवार त्याच्या विगबाबत विचारत होते. तर, नवरदेव केसांवर हात ठेवून माफी मागताना दिसत आहे. त्याचदरम्यान एक व्यक्ती त्याचा विग खेचतो आणि त्याचं सत्य समोर येते. नवरदेवाने सत्य लपवून ठेवल्याचा आरोप करत त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे.
इतकंच नव्हे तर, नवरदेवाला बेदम मारहाण केल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. नवरदेवावर आरोप आहे की पहिली पत्नी असतानाही तो दुसरं लग्न करायला तयार झाला. सध्या पोलिसांनी या प्रकरणात नवरदेवाला ताब्यात घेतलं असून या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.