मुंबई : कधी कधी असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात जे पाहिल्यानंतर आपल्याला हसू आवरत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियाच्या दुनियेत धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ अशा एका व्यक्तीशी संबंधीत आहे, जो सुंदर दिसण्यासाठी सलूनमध्ये गेला होता. परंतु त्याच्यासोबत भलतचं काही तरी घडलं. सुंदर होण्याच्या नावाखाली त्याने जे केलं होतं, ते त्याच्यासाठी मोठी समस्या बनलं होतं.
हा मजेदार व्हिडीओ एकाच दिवसात हजारो वेळा पाहिला गेला आहे आणि नेटकरी देखील त्यावर जोरदार कमेंट करत आहेत.
व्हायरल होत असलेल्या काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण सुंदर दिसण्यासाठी सलूनमध्ये आला आहे. येथे त्याच्या चेहऱ्याला पिल ऑफ मास्क लावण्यात आला. खरेतर चेहऱ्यावरील घाण, ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स काढण्यासाठी हे मास्क चेहऱ्याला लावले जाते आणि जेव्हा हा मास्क चेहऱ्यावरती सुकतो, तेव्हा त्याला खेचून काढला जातो.
परंतु हा पिल ऑफ मास्क काढण्याच्या वेळेला या तरुणाच्या नाकीनऊ आले. हा मास्क खेचून काढण्याच्या वेळी चेहरा पाहण्यासारखा आहे. तुम्ही व्हिडीओत पाहू शकता की, जेव्हा सलूनमधील व्यक्तीने ते तरुणाच्या चेहऱ्यावरून मास्क काढण्यास सुरुवात केली तेव्हा ते खराबपणे अडकले. या तरुणाच्या चेहऱ्याची कातडीही वाईट रीतीने खेचली गेली होती आणि असे वाटत होते की, या सगळ्यात त्याची कातडी खरोखरच निघते की, काय.
हा व्हिडीओ तसे पाहाता मजेशीर आहे, परंतु या प्रक्रियेदरम्यान या तरुणाची काय अवस्था झाली असेल हे, त्याचे त्यालाच माहित. त्यामुळे कधीही असे प्रयोग करताना तुमच्या स्कीनला ते सुट होईल की नाही, त्याचा तुम्हाला केवढा फायदा आणि तोटा होईल हे जाणून घ्या आणि मगच असे एक्प्रिमेंट करा.