Viral Video : अती घाई संकटात नेई! धावती ट्रेन पकडताना दारात अडकला पाय...

Train Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ समोर (shocking video on social media) आला आहे. वारंवार सांगून देखील किंवा रेल्वे अपघाताचे व्हिडीओ (train accident Videos) पाहून काही लोक त्यांच्या मुर्खपणामुळे आपला जीव धोक्यात घालतात. 

Updated: Nov 10, 2022, 08:13 AM IST
Viral Video : अती घाई संकटात नेई! धावती ट्रेन पकडताना दारात अडकला पाय... title=
Viral Train Video Man Falls On Railway Track shocking video on social media nmp

Man Falls On Railway Track Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ समोर (shocking video on social media) आला आहे. वारंवार सांगून देखील किंवा रेल्वे अपघाताचे व्हिडीओ (train accident Videos) पाहून काही लोक त्यांच्या मुर्खपणामुळे आपला जीव धोक्यात घालतात. धावती ट्रेन पकडू नका जीवाला धोका आहे अशी घोषणा रेल्वे स्टेशनवर वारंवार केली जाते. पण काही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि धावती ट्रेन पकडण्याचा नादात आपल्या जीवाशी खेळ करतात. असाच एक रेल्वे प्रवाशाचा मुर्खपणामुळे घडलेला अपघात सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला आहे. हे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

अती घाई संकटात नेई!

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका स्टेशनवरुन एक्स्प्रेस मार्गस्थ झाली आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर काही आरपीएफ जवान गस्त घालत आहेत. एक्स्प्रेस हळूहळू गती घेत असताना अचानक एक प्रवाशांने धावती ट्रेन पडली...त्या व्यक्ती ट्रेन पकडली तर खरी, पण त्याचा पाय ट्रेनच्या दारात अडकला. दार आणि प्लॅटफॉर्मवर तो अर्धवट लटकत होता. त्याचा श्वास थांबला, मृत्यू डोळ्यासमोर दिसतं होता...(Viral Train Video Man Falls On Railway Track shocking video on social media nmp )

नशीब बलवत्तर!

म्हणतात ना काळ आला होता, पण वेळ आली नव्हती.  प्लॅटफॉर्मवर उपस्थित आरपीएफ जवानाने या प्रवाशाला घाईघाई प्लॅटफॉर्मवर ओढलं. या घटनेत प्रवासी किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना जालंधर सिटी रेल्वे स्टेशनवर (Jalandhar Railway Station) घडला आहे. कटिहार-अमृतसर एक्स्प्रेस (Katihar-Amritsar Express) रेल्वे स्टेशनवर येतं असताना घडली. प्रवाशाने बॅग चालत्या ट्रेनच्या गेटच्या आत फेकली आणि गेटवर चढू लागला. यादरम्यान त्याचा तोल बिघडला आणि पाय दारात अडकला. पण सुदैवाना आरपीएफचे उपनिरीक्षक हरविंद सिंग यांच्यामुळे प्रवाशाचा जीव वाचला. सोशल मीडियावर उपनिरीक्षकाचे सर्वत्र कौतुक होतं आहे.