Video : कापडाला स्पर्शही न करता साकारली जाते सुरेख नक्षी; लोप पावत चाललीये 'ही' भन्नाट कला

(art form) 400 वर्षांपूर्वीपासून चालत आलेली ही कला अतिशय खास. किंमत पाहून म्हणाल, बापरे.... इतकं महाग!  

Updated: Nov 10, 2022, 07:49 AM IST
Video : कापडाला स्पर्शही न करता साकारली जाते सुरेख नक्षी; लोप पावत चाललीये 'ही' भन्नाट कला  title=
an artist doing Rogan Art on a cloth will suprprised you watch video

Viral Video : कपडे खरेदीसाठी गेलं असता सहसा त्याची किंमत ऐकल्यानंतर का बरं हे इतकं महाग? हाच प्रश्न आपल्याला पडतो. पण, काही मंडळी मात्र कापड खरेदीसाठी गेलं असता त्या कपड्याची आणि त्याच्यावर करण्यात आलेल्या कलाकुसरीची किंमत जाणत भावात कोणतीही घासाघीस करत नाहीत. कापड आणि त्यावर असणाऱ्या कलाकुसरीचा विषय एकाएकी चर्चेत येण्याचं निमित्त म्हणजे एक व्हिडीओ. (Rogan art Viral Video)

indiaculturalhub या इन्स्टाग्राम पेजवरून @_bijoi_ चा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. इथं एक कलाकार कापडावर सुरेख अशी Design साकारताना दिसत आहे. कोणतीही आखणी नाही, कापडाला स्पर्शही नाही, तरीही तो कलाकार साकारत असणारी नक्षी अगदी Perfect असल्याचं पाहताक्षणी लक्षात येतं. या कलाप्रकाराचं नाव आहे, रोगन आर्ट (Rogan Art)

या कलेचं वेगळेपण काय? 

ही एक अशी कला आहे, जिथं नक्षीकामासाठी सुईधागा किंवा पेंटिंग ब्रशचा वापर केला जात नाही. यामध्ये थेट मनात तयार होणारी नक्षी मेंदूच्या आखलेल्या गणितानुसार बाहेर पडते आणि हातांवाटे अतीशय हळुवारपणे साकारली जाते. 

वाचा : Railway: या ट्रेनमधून 20 तासांचा प्रवास करणं म्हणजे "खतरों के खिलाडी" सारखा अनुभव, प्रवाशांना...

 

गुजरातच्या (Gujrat) कच्छ जिल्ह्यातील निरोणा गावात या नक्षीकामाची पाळंमुळं असल्याचं सांगण्यात येतं. जवळपास 400 वर्षांपूर्वी ही कला इराणहून भारतातील कच्छमध्ये पोहोचली. यानंतर मात्र या कलेला अपेक्षित वाव मिळाला नाही. आता तर फार मोजके कलाकार ही कला साकारताना दिसतात. 

रोगन आर्ट साकारण्यासाठी मेहनत आणि संयम अतिशय महत्त्वाचा 

Rogan Art ही एक Oil Based कला आहे. ज्यामध्ये रोगन वाढवण्यासाठी एरंडेल तेलाला तीन दिवस चुलीवर तापवलं जातं. त्यानंतर जेव्हा हे तेल थंड होतं तेव्हा वनस्पतीपासून मिळणारी रबरवजा वस्तू हाती येते. पुढे या पदार्थाला गरजेनुसार रंग दिले जातात. हे रंगही पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रियेतून तयार केलेले असतात. रोगन तयार झाल्यानंतर ते पाण्यात ठेवलं जातं. 

अशी साकारली जाते अविश्वसनीय नक्षी... 

या कलेसाठी साधारण 6 इंचांची लोखंडी दांडी वापरली जाते. या दांडी (Rod) च्या सहाय्यानं रंग हातांवर मळून त्याची धाग्याइतकी पातळ तार तयार केली जाते आणि याच तारेनं कापडावर नक्षी साकारली जाते. रोगन आर्ट आणखी एका कारणासाठी सर्वांनाच थक्क करतं, कारण यासाठी नक्षी कधीही पूर्वनियोजित नसते, त्यासाठी कोणतीही आखणी केलेली नसते. त्यामुळं कलाकाराची बौद्धिक क्षमता आणि कलात्मकता याच बळावर ती साकारली जाते. 

30 लाखांपर्यंत विकल्या जातात रोगन आर्टच्या वस्तू... 

रोगन आर्ट साकारण्यासाठी बराच वेळ खर्ची घालावा लागो. काही कलाकृती साकारण्यासाठी दीड वर्षांहून जास्त काळ लागतो. यासाठीच रोगन आर्ट असणाऱ्या कलाकृती, कपडे 1500 रुपयांपासून सुरु होऊन त्यांची किंमत 30 लाख रुपयांच्या घरात असते. आज ही कला लोप पावत चालली असली तरीही जागतिक पातळीवर तिला ओळख मिळाली आहे. ज्यामुळं रोगन आर्ट कुणाच्या न कुणाच्या निमित्तानं का असेना पुढच्या पिढीला पाहता येईल हीच आशा.