व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी! साथीदाराचा मृत्यू तरीही त्याला उठवण्यासाठी मोराची धडपड

या मोराकडून शिकावं शेवटपर्यंत साथ निभावणं काय असतं....व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Updated: Jan 6, 2022, 01:59 PM IST
व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी! साथीदाराचा मृत्यू तरीही त्याला उठवण्यासाठी मोराची धडपड title=

मुंबई : जिथे पैसा किंवा छोट्या मोठ्या वादातून माणूस आपल्या अहंकारासाठी एकमेकांची साथ सोडतो तिथे या पक्ष्यांकडून साथ निभावणं काय असतं हे शिकण्यासारखं आहे. साथीदाराचा मृत्यू झाल्यानंतर मोर मनातून पुरता कोलमडला. त्याने अखेरच्या क्षणापर्यंत साथीदाराची साथ निभावली. साथ निभावणं काय असतं ते या मोराकडून शिकण्यासारखं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी येतं. 

साथीदाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याला उठवण्यासाठी वेडी धडपड करणारा मोर पाहायला मिळाला. मोर मनातून पुरता कोलमडून गेला होता. साथीदाराच्या अंत्ययात्रेतही तो सहभागी झाला. इतकच नाही तर तो शेवटच्या क्षणापर्यंत तिथे बसून होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

हा व्हिडीओ राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. मोराचा दोन दिवसापूर्वी मृत्यू झाला होता. या मोराच्या एक डोळ्यामध्ये समस्या होती. तो आपल्या एक साथीदारासोबत राहात होता. दोघांची जोडी होती. जिथे जातील तिथे दोघंही एकसाथ जात होते. 

आपल्या साथीदाराच्या मृत्यूनंतर या मोराला मोठा धक्का बसला. तो 3 तास मृत मोराशेजारी बसून होता. मोराचा मृत्यू झाल्याची माहिती जेव्हा ग्रामस्थांना मिळाली तेव्हा त्यांनी या मोराची अंत्ययात्रा काढून त्याचं दफन केलं. 

जेव्हा या मोराला दफन करण्यासाठी घेऊन जात होते तेव्हा त्यांच्या मागे हा मोर चालत जात होता. आपल्या साथीदाराला शेवटचं त्यानं पाहिलं. ही संपूर्ण घटना तिथल्या लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली.