पेट्रोल किंवा बॅटरीशिवाय चालणारी ही बाईक तुम्ही पाहिली का? व्हिडीओ

या बाईकला ना पेट्रोल ना बॅटरीची गरज... वाढत्या महागाईतला प्रवासाचा उत्तम पर्याय पाहा व्हिडीओ 

Updated: Oct 29, 2021, 04:57 PM IST
पेट्रोल किंवा बॅटरीशिवाय चालणारी ही बाईक तुम्ही पाहिली का? व्हिडीओ title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई: दिवसेंदिवस वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलमुळे नागरिकांचे खूप हाल होत आहेत. वाढत्या महागाईमुळे आता बाईक चालवणं महाग झालं आहे. पेट्रोल दरवाढीचा विरोध करण्यासाठी तर एका तरुणाने चक्क घोड्यावरून ऑफिसला येण्याची परवानगी मागितली होती. आता एक तरुणानं तर चक्क बॅटरीशिवाय आणि पेट्रोलविना चालणारी बाईक तयार केली आहे. 

ही बाईक पाहून तुम्ही दोन मिनिटं चक्रावून जाल. वाढत्या पेट्रोलपासून सुटका करून घेण्यासाठी आता लोक इलेक्ट्रिकल बाईकडे वळताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत काही लोक असाही विचार करत आहेत की त्यांच्याकडे असलेल्या पेट्रोल कारचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर कसे करावे. एवढेच नाही तर काहींनी देसी जुगाडाचा आधार घेत गाडीचे सायकलमध्ये रूपांतर केलं

पहिल्यांदा पाहिल्यानंतर तर ही बाईकच दिसते आहे. मात्र नीट पाहिलं तर दिसेल की या व्यक्तीनं चक्क बाईकचं सायकलमध्ये रुपांतर केलं आहे. हा जुगाड सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. भारतात जुगाडूंची कमी नाही. इथे प्रत्येक समस्येवर तोडगा काढण्यासाठी जुगाड केला जातो. हा जुगाड सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. 

जुगाडू लाइफ हॅक नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड होताच लोकांना तो खूप लाईक केला आहे. सुमारे 60 हजार हून अधिक लोकांनी हा व्हि़डीओ लाईक केलं आहे. तर 10 लाख वेळा पाहिला गेला आहे.