रुपाणींच्या मंत्रीमंडळात या नेत्यांना मिळू शकते संधी

गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टी सलग सहाव्यांदा सरकार स्थापन करत आहे. मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा विजय रूपाणी आज शपथ घेणार आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून नितिन पटेल हे शपथ घेणार आहेत.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 26, 2017, 10:53 AM IST
रुपाणींच्या मंत्रीमंडळात या नेत्यांना मिळू शकते संधी title=

नवी दिल्ली : गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टी सलग सहाव्यांदा सरकार स्थापन करत आहे. मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा विजय रूपाणी आज शपथ घेणार आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून नितिन पटेल हे शपथ घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह आणि एनडीए शासित 18 राज्यांमधील मुख्यमंत्री शपथविधीसाठी उपस्थित राहणार आहेत. रूपाणीच्या नवीन कॅबिनेटमध्ये २० जुन्या आणि नव्या चेहऱ्यांना लोकांना स्थान मिळणार आहे.

कौशिक पटेल जे नाराणपुरामधून निवडून आले आहेत त्यांची कॅबिनेटपदी वर्णी लागू शकते. तसेच भूपेंद्र सिंह चुडासमा यांना विधानसभा अध्यक्ष बनवलं जाऊ शकतं..

कॅबिनेट मंत्री?

कॅबिनेट मंत्री म्हणून गणपत वसावा, प्रदीप सिंह जाडेजा, जयेश रातडिया, बाबू बोखिरिया, आर सी फलदु, जितू वाघाणी, दिलीप ठाकोर, कौशिक पटेल हे शपथ घेऊ शकतात.

राज्यमंत्री?

राज्य मंत्री के पुरुषोत्तम सोलंकी, बच्चू भाई खाबड, राजेंद्र त्रिवेदी, वल्लभ काकड़िया, अरुण सिंह राणा, शशिकांत पंड्या, वासन भाई आहीर, नीमा बेन आचार्य, केशुभाई नाकराणी, ​​कुमार कानाणी, विभावरी दवे, सी के राओलजी, मनीषा वकील, पंकज देसाई हे शपथ घेऊ शकतात.