VIDEO: क्रुर आणि निर्दयी बापाचा व्हिडिओ पाहून तुमचा संताप होईल

सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका लहान मुलाला त्याचे वडिल बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 27, 2018, 07:41 PM IST
VIDEO: क्रुर आणि निर्दयी बापाचा व्हिडिओ पाहून तुमचा संताप होईल title=

नवी दिल्ली : सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका लहान मुलाला त्याचे वडिल बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

व्हायरल झालेला हा व्हिडिओ कर्नाटकची राजधानी बंगळुरुमधील असल्याचं बोललं जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओत अमानुष मारहाण करणारा व्यक्ती हा त्या लहान मुलाचा पिता असल्याचं समोर आलं आहे. हा व्हिडिओ जवळपास दिड महिन्यापूर्वीचा असल्याचं बोललं जात आहे. 

१० वर्षांच्या मुलाला मारहाण करण्याचा व्हिडिओ त्या मुलाच्याच आईने मोबाईलने शूट केला होता. मोबाईल खराब झाल्यानंतर तो रिपेअरिंगसाठी देण्यात आला होता. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती समोर आली आहे. 

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो पोलिसांपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर बंगळुरु पोलिसांनी आरोपी व्यक्तीला अटक केली आहे. CNNnews18 ने आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओत दिसत आहे की, एक व्यक्ती आपल्याच १० वर्षांच्या मुलाला अमानुष मारहाण करत आहे. हा व्यक्ती लहानग्याला उचलून-उचलून पलंगावर आपटत आहे.