व्हिडिओ : भररस्त्यात अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ

व्हिडिओमधील सर्व आरोपींची ओळख पटली असून या चार तरुणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय

Updated: Apr 30, 2018, 08:02 PM IST

जहानाबाद, बिहार : बिहारच्या जहानाबादमधून ही धक्कादायक बातमी... चार अल्पवयीन तरुणांनी एका अल्पवयीन मुलीसोबत भररस्त्यात लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडलीय. विशेष म्हणजे माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा काही मुलांनी व्हिडिओ काढला... या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर बिहार पोलिसांनी मोबाईलच्या आधारे कारवाई सुरु केली आहे. 

व्हिडिओमधील सर्व आरोपींची ओळख पटली असून या चार तरुणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. एका मुलीसोबत चार मुलांनी केलेल्या जबरदस्तीच्या व्हीडीओने देशभर संतापाची लाट पसरली आहे. 

मागील आठवड्यात शुक्रवारी ही घटना घडल्याचे समजतेय. जहानाबादच्या रस्त्यावर सात ते आठ युवकांनी केलेल्या या प्रकारात काही अल्पवयीन असल्याचेही समजतंय.

दरम्यान या प्रकरणावर तीव्र पडसाद उमटताच पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे.