माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येत दोषी 31 वर्षांनंतर जेलबाहेर

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या नलिनी श्रीहरन यांची 31 वर्षांनी सुटका करण्यात आली आहे. आज तुरुंगातून बाहेर आल्या आहेत.  आता ती सामान्य नागरिकाप्रमाणे आयुष्य जगू शकते.

Updated: Nov 13, 2022, 10:48 AM IST
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येत दोषी  31 वर्षांनंतर जेलबाहेर title=

Nalini Sriharan : माजी पंतप्रधान राजीव गांधी (former PM Rajiv Gandhi ) यांच्या हत्येत दोषी ठरलेल्या नलिनी श्रीहरनची (Nalini Sriharan) सुटका करण्यात आली. तामिळनाडूतल्या वेल्लोर जेलमधून 31 वर्षांनंतर नलिनीची तुरूंगातून सुटका झाली. सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी राजीव गांधी हत्याप्रकरणातील 6 आरोपींच्या सुटकेचे आदेश दिले होते. त्यानुसार नलिनीला सोडण्यात आलं. नलिनी आता भारतातच राहणार की लंडनमध्ये आपल्या मुलीसह हे अजून स्पष्ट झालेलं नाही. 

माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणातील सहा दोषींपैकी एक असलेल्या नलिनी श्रीहरन यांची शनिवारी वेल्लोर तुरुंगातून सुटका करण्यात आली. नलिनी यांचे पती व्ही श्रीहरन ऊर्फ ​​मुरुगन, संथन, रॉबर्ट पायस आणि जयकुमार हे श्रीलंकेचे आहेत तर नलिनी आणि आरपी रविचंद्रन हे तामिळनाडूचे आहेत. राजीव गांधी हत्याकांडातील सुमारे तीन दशकांपासून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नलिनी श्रीहरन आणि इतर पाच दोषींची सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मुक्तता केली. या प्रकरणातील दोषी एजी पेरारिवलनला सोडण्याच्या निर्णयाच्या आधारे न्यायालयाने सर्व दोषींना हा मोठा दिलासा दिला आहे. तत्पूर्वी, नलिनी यांना पोलिसांनी कातपाडी पोलीस ठाण्यात सहीसाठी नेले.

त्यानंतर नलिनी यांना त्यांच्या सुटकेशी संबंधित औपचारिकता पूर्ण करण्यासाठी वेल्लोर तुरुंगात नेण्यात आले. त्याचप्रमाणे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या प्रती पुझल आणि मदुराई मध्यवर्ती कारागृहांना पाठवण्यात आल्या. जिथे उर्वरित लोक ठेवण्यात आले आहेत. त्यांचे वकील पी पुगझेंडी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नलिनी श्रीहरन तुरुंगातून बाहेर पडण्यास तयार आहेत. ती एक स्वतंत्र स्त्री असेल आणि तिच्या भविष्याबद्दल निर्णय घेईल.

ती आपल्या मुलीसोबत चेन्नईत राहणार की लंडनमध्ये राहणार हे लगेच स्पष्ट झाले नाही. याबाबतचा निर्णय नलिनी स्वत: घेतील, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले. नलिनी यांच्या पतीबाबत विचारलेल्या प्रश्नावर ज्येष्ठ वकील म्हणाले की, राज्य सरकार निर्णय घेईल. संथनने यापूर्वीच श्रीलंकेत परतण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यांना सुरुवातीला श्रीलंकेच्या निर्वासित छावणीत ठेवले जाऊ शकते.

दरम्यान,  राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातला आजचा सातवा दिवस आहे. आज ही यात्रा हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रवास करणार आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला राज्यातील 250 हून अधिक लेखक आणि कलाकारांनी पाठिंबा दिलाय.. यात साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांसह माजी सनदी अधिका-यांचाही समावेश आहे.