Viral Video : 'आय लव्ह यू रामू' आजीबाईवर चढला Valentine Day चा फिव्हर...

Video Viral :  जिकडे तिकडे सध्या Valentine Day चा फिव्हर दिसतोय, अशातच एका आजीचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.

Updated: Feb 11, 2023, 11:48 AM IST
 Viral Video : 'आय लव्ह यू रामू' आजीबाईवर चढला Valentine Day चा फिव्हर... title=
Valentine Day Propose day I love you Ramu worker old couple Romance Trending Video Viral on Social media

Trending Video : सध्या पाहवं तिकडे प्रेमाचे वारे वाहत आहेत. कारण फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. तसं तर 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे (Valentine Day 2023) म्हणून साजरा केला जातो. पण त्यापूर्वी अख्खा आठवड्या चॉकलेट डे, प्रपोज डे (Propose day), किस डे असाही साजरा केला जातो. तरुण पिढीमध्ये तर या व्हॅलेंटाईनचा वेगळाच उत्साह दिसून येतो. मार्केटही या प्रेमी युगुलांसाठी खास गिफ्टने सजलं आहे. प्रेम ही अशी भावना आहे ती कधी पण कोणासाठी पण येऊ शकते. प्रेम (love) हे अंधळं असतं. कधी कोणावर कुठे होईल सांगता येतं नाही. प्रेम व्यक्त करण्यासाठी काही खास आणि पैशांची गरज नाही. प्रेम कधीही कुठल्याही परिस्थितीत व्यक्त करता आलं पाहिजे...आणि हो प्रेमाला वयाची मर्यादाही नसते. असाच एका आजी आजोबांचा व्हिडीओ (old couple Video) नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. (Propose video)

तुझं माझं सेम!

हो प्रेम ही भावना आहे ती वयामध्ये मर्यादीत नाही. तरुणानीच प्रेम करावं असं कुठे लिहिलं आहे. आपल्या जीवनसाथी बद्दल आपल्याला वाटणाऱ्या भावना आपण कुठल्याही वयात व्यक्त करु शकतो. त्यासाठी महागडे हॉटेल, फुलांचा गुच्छा अगदी सुंदर जागा असं काही नको बस्स एक भाव...शेतात राबणाऱ्या आजीचा हा व्हिडीओ सगळ्यांना अशीच शिकवण देऊन जातो. परिस्थिती कशीही असो प्रेम करता आलं पाहिजे...शेतात घामाने ओलं चिंबू झालेल्या आजीने थकलेल्या आपल्या जोडीदाराला एक छोटंस फुल दिलं आणि आय लव्ह यू रामू म्हटलं...त्यानंतर आजोबांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. (Valentine Day Propose day I love you Ramu worker old couple Romance Trending Video Viral on Social media)

वेड लागलं आजीला!

अहो हो, अशीच काहीशी प्रतिक्रिया आजोबांनी दिली. जसं आजीने लव्ह यू म्हटलं आजोबाने तिला प्रेमाने मारलं. त्यांचा देहबोलीवरून एवढंच कळतं की, काय बाईला वेड लागलं आहे का? तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता. एक महिला बाळाला कंबरत घेऊन आहे. ती आजीला थांबवायचा प्रयत्न करत आहे. पण आज्जी तर फुल्ल जोशात आहे. तिने ठरवलं आज तर बुढाला लव्ह यू म्हणायचंच...

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. bhillsamadhan346 या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या कुठला आहे याबद्दल काही समजलं नाही. पण नेटकऱ्यांना हा व्हिडीओ खूप प्रेरणादायी वाटला आहे. आयुष्य एकदाच मिळतं ते जगता आलं पाहिजे. परिस्थिती कुठलीही असो छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधता आला पाहिजे.