Snake Viral Video : तरुणाने हेल्मेट घालायला घेतलं अन् मग त्यातून...

Viral Video : आता काय हेल्मेट पण घालायचं नाही का? अहो तो तरुण हेल्मेट घालायला गेला अन् मग...थरकाप उडविणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Updated: Feb 11, 2023, 01:16 PM IST
Snake Viral Video : तरुणाने हेल्मेट घालायला घेतलं अन् मग त्यातून... title=
Trending Video Snake at Helmet Viral Video on Social media

Snake Viral Trending Video : सापाचं (Snake) नाव पण घेतलं तरी आपल्याला घाम फुटतो. कारण या सापाने चावा घेतला तर आपण एका क्षणात मरतो. भीतीदायक आणि थरकाप उडविणारे अजगर (Pythons Video) , विषारी साप आणि कोब्राचे (Cobra Video) अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social media video) होतं असतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ (Viral Video )आपली झोप उडवतो. घराबाहेर पडायचं आणि दुचाकी घेऊन जायची म्हटलं की पहिले आपण हेल्मेट घातलं पाहिजे. मग काय तो तरुण हेल्मेट (Helmet News) घालायला गेला अन् मग...पायाखालची जमीन सरकणार हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या हृदयाचे ठोके चुकवितोय.

त्याने हेल्मेट हातात घेतला अन् मग...

सोशल मीडियावर व्हायरल होतं असलेल्या व्हिडीओमध्ये एका तरुणाच्या हातात हेल्मेट दिसत आहे. त्याचा पायात शूज आहेत, याचा अर्थ तो तरुण घराबाहेर पडतोय. पण हे काय हेल्मेटसोबतच त्या तरुणाच्या हातात किचनमधील चपाती शेकण्याचा चिमटादेखील आहे. हा तरुण त्या हेल्मेटमधून चिमट्याने काही तरी काढण्याचा प्रयत्न करत आहे. तो हेल्मेटमधून काय काढतोय हे कळतं नाही...पण तुम्ही हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा...(Trending Video Snake at Helmet Viral Video on Social media)

थरकाप उडविणारा व्हिडीओ

जसा जसा हा व्हिडीओ पुढे जातो तो तरुण नेमकं काय काढतोय हे लक्षात येतं. थोड्याच वेळात आपल्या अंगावर काटा येईल कारण त्या हेल्मेटमधून साप निघतो...हो, साप...दिसायला इवलूसा वाटणारा हा साप विषारी आहे. नशिब तरुणाने हेल्मेट घालण्यापूर्वी त्यात साप पाहिला अन्यथा अनर्थ झाला असता. कारण हेल्मेटमध्ये तो अशा ठिकाणी जाऊन बसला होतो. ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. 

व्हिडीओ व्हायरल 

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील aahanslittleworld या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या हा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण झाले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. गावाकडील घरांमध्ये साप, जंगली प्राण्याची भीती असते. हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो.