Uttarakhand Glacier Burst : शरीर ढीगाऱ्यात... फक्त मान बाहेर, मजुराच्या तोंडून ऐका पूर्ण कहाणी

15 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय.

Updated: Feb 8, 2021, 09:27 AM IST
Uttarakhand Glacier Burst : शरीर ढीगाऱ्यात... फक्त मान बाहेर, मजुराच्या तोंडून ऐका पूर्ण कहाणी title=

नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये जोशीमठ इथे हिमकडा तुटल्यामुळे प्रचंड नुकसान झालंय. आयटीबीपीने आत्तापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढले आहेत. उत्तराखंडमध्ये रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. अद्याप इथून 125 मृतदेह बेपत्ता आहेत. तर 15 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय.

पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय कर्णप्रयागमध्ये अलकनंदा नदी किनाऱ्यावरील घरे रिकामी करण्यात आली आहेत. ग्लेशियर तुटल्यामुळे (Uttarakhand Glacier Burst) ऋषीगंगा तपोवन हायड्रो प्रोजेक्टचा बांध फुटला आणि नदीतील पाण्याची पातळी वाढली. दरम्यान बोगद्यात पूर्ण शरीर अडकलेल्या मजुराने आपली कहाणी सांगितलीय. उत्तराखंड पोलिसांनी हा व्हिडीओ आपल्या ट्वीटर हॅंडलवरुन शेअर केलाय.

चमोलीत हिमनदी फुटल्यानंतर नद्यांना आलेल्या पूरातून आल्यानंतर आयटीबीपीने मदत आणि बचाव कार्य सुरु केलंय. आयटीबीपी जवान अरुंद बोगद्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढत आहेत. आपण मानेपर्यंत बोगद्यात अडकले होतो असे सुटका झालेल्या व्यक्तीने सांगितले. "बोगद्याचा ढिगारा माझ्या मानेपर्यंत भरला होता, मी स्वत: सळी पकडून बाहेर आलोय. बोगद्यात तुम्हाला भीती वाटली नाही का ? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर त्याने काही उत्तर दिले नाही.

बचावकार्यात आयटीबीपी, एनडीआरएफ, सीडीआरएफ, आर्मी, एअरफोर्स टीम्स अविरत प्रयत्न काम करत आहेत. पाण्याचा प्रवाह ओसरल्यामुळे मदतकार्याला वेग आलाय. अजूनही १२५ जण बेपत्ता आहेत. 

गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की एनडीआरएफची चार पथके (सुमारे 200 जवान) हवाईमार्गे डेहरादून पोहोचत आहेत तेथून ते जोशीमठला जातील. त्याचप्रमाणे आयटीबीपी आणि राज्य आपत्ती दलाचे कर्मचारी अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी प्रभावित ठिकाणी पोहोचले आहेत.

अपर जिलाधिकारी टिहरी शिव चरण द्विवेदी यांनी माहिती दिली की, धौली नदीला पूराची सूचना मिळताच अलर्ट जारी करण्यात आला आहे. हरिद्वार जिल्हा प्रशासनाने येथे अलर्ट जारी केला आहे. ऋषिकेशमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. नदीतून बोटींग आणि राफ्टिंग बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.