विकृतपणा! मंदिरांच्या दानपेटीत टाकायचा वापरलेले कंडोम

मंदिराच्या दानपेटीत वापरलेले कंडोम टाकणाऱ्या विकृत व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. 

Updated: Jan 1, 2022, 11:45 AM IST
विकृतपणा! मंदिरांच्या दानपेटीत टाकायचा वापरलेले कंडोम title=

बंगळूरू : मंदिराच्या दानपेटीत वापरलेले कंडोम टाकणाऱ्या विकृत व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. कर्नाटकमध्ये ही घटना घडली असून हा व्यक्ती आता पोलिसांचा ताब्यात आहे. मुख्य म्हणजे या विकृत व्यक्तीला त्याने केलेल्या कृत्याचा अजिबात पश्चाताप नाहीये.

आरोपी देवदास देसाई याने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं की, येशूचा संदेश देण्यासाठी हे करत असून या कृत्याचा आपल्याला कोणताही पश्चाताप नाही.' जवळपास वर्षभरापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. हा व्यक्ती मंदिराच्या आवारातून बाहेर पडायचा आणि वापरलेले कंडोम दानपेटीत टाकायचा.

पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे, 62 वर्षीय आरोपी देवदास देसाईने मंगळुरूच्या अनेक मंदिरांमध्ये हे कृत्य केलं आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र तो पोलिसांच्या हाती लागला नाही. 

दरम्यान गेल्यावर्षी 27 डिसेंबर रोजी कोरजना कट्टे गावातील एका मंदिराच्या दानपेटीत वापरलेला कंडोम मिळाल्याची माहिती होती. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मंदिर आणि परिसरात बसवलेले कॅमेरे तपासले. यामध्ये पोलिसांना आरोपीचा चेहरा दिसला. या फोटोच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली. 

पोलिसांच्या चौकशीत देवदास देसाईने अशाप्रकाचं कृत्य अनेक मंदिरांमध्ये केलं असल्याचं कबूल केलं. एकूण 18 मंदिरांमध्ये त्याने हे कृत्य केल्याचं सांगितलंय. यापैकी केवळ पाच मंदिरांनी पोलिसांकडे तक्रारी केली.

पोलीस आयुक्त शशीकुमार यांनी सांगितलं की, आरोपीने म्हणाला, तो मंदिरांमध्ये वापरलेले कंडोम फेकायचा जेणेकरून त्याची विटंबना करून तो इतरांना आपल्या धर्माकडे वळवू शकेल. केवळ मंदिरातच नाही तर काही गुरुद्वारा आणि मशिदींमध्येही आरोपींनी हे कृत्य केलंय. 

आरोपीच्या म्हणण्याप्रमाणे, बायबलमध्ये येशूशिवाय दुसरा देव नाही असं म्हटलं आहे. मी कंडोम फेकतो कारण अशुद्ध वस्तू फक्त अशुद्ध ठिकाणीच टाकल्या पाहिजेत.