नवी दिल्ली : Coronavirus कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकड्यामध्ये मागील चोवीस तासांत आणखी भर पडली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मागील २४ तासांत देशात ३७,७२४ कोरोनाबाधित रुग्ण नव्यानं आढळले आहेत. परिणामी देशातील एकूण रुग्णसंख्या ११,९१,९१५ पर्यंत पोहोचली आहे.
कोरोना रुग्णवाढीचा वेग असाच कायम राहिल्यास येत्या काही दिवसांमध्ये हा आकडा १२ लाखांच्या घरात पोहोचण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आरोग्य खात्याच्या माहितीनुसार सध्या देशभरात ४,११,१३३ रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत. तर, आतापर्यंत ७,५३,०५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाच्या विळख्यात अल्यामुळं आतापर्यंत २८,७३२ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले असल्याची माहिती केंद्रिय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली.
२१ जुलैपर्यंत देशात १,४७,२४,५४६ जणांच्या कोरोना चाचण्या झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना चाचण्यांची संख्या वाढवल्यामुळं आणि अनलॉकचे टप्पे सुरु झाल्यामुळं कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं निदर्शनास आलं होतं. परिणामी अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता.
Spike of 37,724 cases and 648 deaths reported in India in the last 24 hours.
Total #COVID19 positive cases stand at 11,92,915 including 411133 active cases, 7,53,050 cured/discharged/migrated and 28,732 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/U1M6Wdqqyw
— ANI (@ANI) July 22, 2020
देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आढळल्यामुळं राज्यातील अनेक जिल्हे सध्या लॉकडाऊनमध्येच आहेत. तर, अनलॉक झालेल्या ठिकाणांवरही काही नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश शासन आणि आरोग्य यंत्रणांकडून देण्यात आले आहेत.