पार्श्वभागातून साप पोटात गेल्याचा तरुणाचा दावा! डॉक्टरांनी तपासणी केल्यावर समोर आलं सत्य

Shocking News : उत्तर प्रदेशातील हा तरुण हरदोई मेडिकल कॉलेजच्या आपत्कालीन विभागात व्हिवळत पोहोचला होता. त्याच्यासोबत आलेल्या कुटुंबियांनी हकीकत सांगताच डॉक्टरांनाही सुरुवातीला धक्का बसला होता.मात्र उपचारानंतर सत्य समोर आले

Updated: Apr 7, 2023, 06:14 PM IST
पार्श्वभागातून साप पोटात गेल्याचा तरुणाचा दावा! डॉक्टरांनी तपासणी केल्यावर समोर आलं सत्य title=
(प्रातिनिधीक छायाचित्र)

Shocking News : आतापर्यंत आपण लहान मुलांनी एखादी वस्तू गिळली असल्याचे ऐकले असेल. तोंडावाटे नाणे किंवा अन्य कोणतीही वस्तू लहान मुले गिळतात. पण कधी कधी हे धोकादायकही ठरतं. तर कधी शस्त्रक्रियेद्वारे ती वस्तू बाहेर काढावी लागते. मात्र एका व्यक्तीने पार्श्वभागातून साप (Snake) आपल्या पोटात गेल्याचा दावा करत रुग्णालय गाठलं होतं. हा सर्व प्रकार ऐकून डॉक्टरांनाही धक्का बसला. मात्र त्या व्यक्तीच्या तपासण्या केल्यानंतर याबाबत मोठा खुलासा झाला. उत्तर प्रदेशात (UP News) घडलेल्या या प्रकाराने मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांना अडचणीत आणले होते.

उत्तर प्रदेशातील हरदोई मेडिकल कॉलेजच्या आपत्कालीन विभागात एक तरुण वेदनेने व्याकूळ होत डॉक्टरांसमोर पोहोचला होता.  तरूणाने रडायला सुरुवात केली आणि सांगितले की, शौच करत असताना त्याच्या पार्श्वभागातून साप शिरला आणि तो पोटात शिरला. डॉक्टरांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून या तरुणावर तातडीने उपचार सुरू केले. मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान या तरुणाला लाकूड लागल्याने रक्त येत असल्याचा दावा केला.

हरदोई जिल्ह्यातील अमली पदार्थांचा व्यसनाधीन असलेला हा तरुण आपली तक्रार घेऊन रुग्णालयात पोहोचला होता. सोमवारी रात्री मेडिकल कॉलेज पोहोचलेल्या या तरुणाने डॉक्टरांना सांगितले की, सापाने त्याच्या पार्श्वभागाला चावा घेतला आणि नंतर तिथूनच पोटात शिरला. तरुणाचा गोंगाट पाहून त्याला दाखल करण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी त्याची तपासणीही करण्यात आली. पण काहीही निष्पन्न झाले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे नातेवाईक आले आणि आम्हाला दुसरीकडे उपचार करायचे आहेत असे सांगून त्याला घेऊन गेले.

सोमवारी रात्री 8:15 वाजता बनियानी पूर्वा गावात राहणारा महेंद्र (25) याच्या कुटुंबीयांनी त्याच्यासह रुग्णालय गाठले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की महेंद्र उघड्यावर शौचास गेला होता. जिथे त्याला शौच करताना काळ्या रंगाच्या सापाने चावा घेतला आणि त्यानंतर तो पार्श्वभागामधून पोटात शिरला. डॉक्टरांनी चौकशी केली असता महेंद्रने पोटात दुखत असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्यांना काही जाणवले नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी सकाळी महेंद्रचे सीटी स्कॅन केले. मात्र त्यामध्ये काहीही आढळून आले नाही. त्यानंतर त्याचे कुटुंबिय त्याला घेऊन गेले.

दरम्यान, डॉक्टरांनी सांगितले की, "महेंद्र झुडपात शौचासाठी गेला होता. त्यावेळी एखादे लाकूड आत शिरले होते, त्यामुळे रक्त वाहू लागले होते. तो दारूच्या नशेत होता, त्यामुळे त्याला साप चावला आणि त्याच्या पोटात घुसला असा भ्रम त्याला झाला होता. मात्र तपासात काहीही निष्पन्न झाले नाही."