नवी दिल्ली : जगातील सात आश्चर्यांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा ताजमहाल आता पर्यटनस्थळाच्या यादीत राहिला नाही. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने जाहीर केलेल्या ‘टूरिस्ट डेस्टिनेशन’बुकलेटमधून ताजमहालचे नाव हटविल्याचे वृत्त आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ‘टूरिस्ट डेस्टिनेशन’बाबत उत्तर प्रदेश सरकारकडून नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात ताजमहालचे नाव नाही. या बदलाबाबत उत्तर प्रदेश सरकारकडून अधिकृत प्रतिक्रीया देण्यात आली नाही. दरम्यान, ताजमहालला वगळण्यात आले आहे. मात्र, त्या ऐवजी या यादीत गोरखधाम मंदिराला स्थान देण्यात आले आहे. या बुकलेटमध्ये गोरखधाम मंदिराचे फोटो आणि इतिहास तसेच, महत्त्व सांगितले आहे. तसेच, बुकलेटमध्ये गंगा आरतीचाही समावेश करण्यात आला आहे.
विशेष असे की, उत्तर प्रदेश सरकारने सांस्कृतीक वारसा सांगणाऱ्या यादीतूनही ताजमहालचे नाव हटवले आहे. कही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ताजमहाललला भारतीय संस्कृतीचा हिस्सा मानन्यास नकार दिल्याचेही प्रसारमाध्यमांनी म्हटले होते.