जम्मू : श्रीनगरमधील सीमा सुरक्षा दलाच्या १८२ क्रमांकाच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ३ जवान जखमी झाल्याची सूत्रांनी माहिती दिली. हा हल्ला पहाटे ४.३० वाजणाच्या सुमारास करण्यात आला आहे.
दहशतवाद्यांनी श्रीनगर विमानतळाजवळील बीएसएफ कॅम्पमध्ये प्रवेश केला. ४ ते ५ दहशतवादी असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. दरम्यान, भारतीय सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले गेलेय. सध्या चकमक सुरु आहे.
या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. एका इमारतीत आणखी तीन ते चार दहशतावादी लपल्याची भिती व्यक्त केली जात आहे. दहशतवादी आणि भारतीय लष्टकारात अद्याप चकमक सुरु आहे. दरम्यान, सुरक्षितेसाठी श्रीनगर विमानताळाची सर्व उड्डे रद्द करण्यात आली आहेत. तर श्रीनगर महामार्ग बंद करण्यात आलाय.