मतदारांना आकर्षित करण्यासाठी 'सपा'चा नवा फंडा, अखिलेश यादव यांची मोठी घोषणा

समाजवादी पार्टीच्या ऑफरमुळे भाजपसह इतर पक्षांची कोंडी होण्याची शक्यता

Updated: Jan 18, 2022, 04:52 PM IST
मतदारांना आकर्षित करण्यासाठी 'सपा'चा नवा फंडा, अखिलेश यादव यांची मोठी घोषणा title=

UP Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी (UP Assembly  Election) सपाचे (SP) राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी मोठी घोषणा केली आहे. समाजवादी पार्टी एक मोहिम राबवणार असून ज्या घरगुती ग्राहकांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज (Free Electricity) हवी आहे त्यांनी पक्षाकडे आपली नावे नोंदवावीत, अशी घोषणा अखिलेश यादव यांनी केली आहे. सपाचा हा प्रचार बुधवारपासून सुरू होणार आहे. वीज बिलावर जे नाव येईल ते यादीत लिहावे असं आवाहन करण्यात आलं आहे. समाजवादी पक्ष घरोघरी जाऊन लोकांची नावे नोंदवून घेणार आहे.

सपाची मोठी मोहीम
अखिलेश यादव म्हणाले की, ज्या लोकांनी वीजेचा वापर केलेला नाही, किंवा त्यांच्याकडे मीटरच नाही अशा लोकांनाही वीज बिलं पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या (EC) नियमांचं पालन करून संपूर्ण राज्यात प्रचार राबविण्यात येणार आहे. समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन लोकांची नावे लिहिणार आहेत. आम्ही यूपीमध्ये समृद्धीसाठी काम करू, असं अखिलएश यादव यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

सपाविरोधातील याचिकेवर काय म्हणाले अखिलेश?
समाजवादी पक्षाची मान्यता संपुष्टात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर बोलताना अखिलेश यादव म्हणाले, आमच्या पक्षाची मान्यता संपली तर ती भाजपचीही मान्यता रद्द होईल कारण भाजपमध्ये सर्वाधिक गुन्हेगार आहेत. भाजपने सर्वाधिक आमदार विधानसभेत आणले आहेत. 

जाहीरनामा कधी प्रसिद्ध करणार?
अखिलेश यादव म्हणाले की, समाजवादी पक्षाच्या जाहीरनाम्याबाबत जनतेकडून सातत्याने सूचना येत आहेत. भाजपचा जाहीरनामा आल्यानंतर समाजवादी पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. ज्यांनी आम्हाला निवेदन दिलं आहे त्यांच्या सूचना जाहीरनाम्यात समाविष्ट केल्या जातील.

लॅपटॉप वाटपामुळे रोजगार मिळाला
अखिलेश यादव म्हणाले की, आमच्या सरकारमध्ये 18 लाखांहून अधिक लॅपटॉप देण्यात आले. आजही तुम्ही जाऊन त्या मुलांना भेटलात तर लक्षात येईल की त्यांना लॅपटॉपचा किती फायदा झाला? त्यातले काही अभ्यासात पुढे गेले तर काही नोकरीला लागले.