अहमदाबाद: गुजरातच्या कानवाला परिसरात चोरट्यांनी पैंजणांसाठी एका ८० वर्षांच्या वृद्ध महिलेचे पाय छाटल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. अतिरक्तस्त्रावामुळे या वृद्धेचा मृत्यू झाला. येथील छोटा उदयपूर परिसरात हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही ग्रामस्थांनी येथील शेतात एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती दिली. पोलीस याठिकाणी पोहोचले तेव्हा वृद्ध महिलेचे घोट्यापर्यंतचे पाय कापलेले होते. प्राथमिक तपासानंतर चोरट्यांना तिच्या पायातील पैंजण काढण्यासाठी हे कृत्य केलाचा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. ही महिला जवळच्याच घरात एकटीच राहत असे. चोरट्यांनी लुटीच्या उद्देशाने तिच्या घरावर दरोडा टाकला. मात्र, घरात काहीच न मिळाल्यामुळे चोरट्यांनी वृद्ध महिलेचे पाय कापून पैंजण काढून घेतले. या पैंजणांची किंमत साधारण २० हजार रुपये इतकी होती. या निर्घृण हत्येमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Gujarat: Unidentified robbers killed an 80-year-old woman & chopped off her legs to steal her silver 'kadas' (anklets) in Kanalava of Chhota Udepur yesterday. MK Gosai, Police Station In-charge of Panvad says, "We have started investigation with the help of FSL team & dog squad." pic.twitter.com/FA6I95KYkh
— ANI (@ANI) January 13, 2019
पोलिसांनी तात्काळ या घटनेचा तपास सुरु केला असून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आरोपींना शोधण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळा आणि श्वानपथकाची मदत घेतली जात आहे.