लष्कराच्या यादीतील १२ पैकी १० दहशतवाद्यांचा खात्मा

सर्वाधिक घातक दहशतवाद्यांची यादी तयार

Updated: Jan 14, 2019, 04:30 PM IST
लष्कराच्या यादीतील १२ पैकी १० दहशतवाद्यांचा खात्मा title=

श्रीनगर : काश्मीरमध्ये आतापर्य़ंत १० दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्करला यश आलं आहे. जून २०१७ मध्ये १२ सर्वाधिक घातक दहशतवाद्यांची यादी तयार करण्यात आली होती. यापैकी भारतीय लष्करानं १० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या १२ दहशतवाद्यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता या यादीतील झाकीर मुसा आणि रियाझ नाईको या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. लष्कराला माहिती मिळाल्यानंतर सुरु झालेल्या सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. त्यानंतर कारवाईत २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर दगडफेक सुरु झाली. त्यानंतर या भागातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात दारुगोळा सापडला.

लष्काराने २०१८ मध्येच या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी योजना आखली होती. जम्मू-काश्मीरमध्ये ऑपरेशन आलआउटच्या अंतर्गत २०१८ मध्ये आतापर्यंत काश्मीरमध्ये २५१ दहशतवादी मारले गेले आहेत. मागील १० वर्षातला हा सगळ्यात मोठा आकडा आहे. यानंतर आता लष्कराने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी २०१९ मध्ये देखील नवी योजना आखली आहे.

कश्मीरामध्ये या दहशतवाद्यांना शोधून शोधून मारलं जाईल. ज्या ५ भागामध्ये दहशतवादी लपून बसतात त्या भागाला टार्गेट केलं जाणार आहे. कुलगाम, अनंतनाग, बडगाम, शोपियां आणि श्रीनगरमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दोन वर्षात काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांचे अनेक कमांडर मारले गेले आहेत. काश्मीरमध्ये आता फक्त रियाज नायकू आणि जाकिर मूसा यांचा खात्मा करणं बाकी आहे.