या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारे झाले मालामाल!

सुरक्षित प्रवासासाठी वाहनांचे टायर चांगल्या स्थितीत असणे महत्वाचे आहे. पण ज्यांनी टायर कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली ते मालामाल झाले.

Updated: Nov 22, 2017, 08:09 AM IST
या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारे झाले मालामाल! title=

नवी दिल्ली : सुरक्षित प्रवासासाठी वाहनांचे टायर चांगल्या स्थितीत असणे महत्वाचे आहे. पण ज्यांनी टायर कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली ते मालामाल झाले. आकडेवारीनुसार, टायर सेक्टरमधील ४ कंपन्यांचे शेअर्स गेल्या १५ वर्षात ५ हजार टक्क्यांनी वाढले आहेत. चला जाणून घेऊया त्या कंपन्या...

१ लाखाची गुंतवणूक ६ कोटी रिटर्न

टायर निर्माती कंपनी बालकॄष्ण इंडस्ट्रीज(BIL) च्या शेअरमध्ये १५ वर्षाआधी केलेल्या १ लाख रूपयांच्या गुंतवणुकीवर आता ६ कोटी रिटर्न मिळाले आहेत. १५ नोव्हेंवर २००२ ला ३.४७ रूपयांचे शेअर १७ नोव्हेंबर २०१७ ला २ हजार ०८३ रूपयांचे झाले. 

MRF च्या गुंतवणुकदारांना मोठा फायदा

शेअर किंमतीच्या बाबतील सर्वात मगान स्टॉक MRF सुद्धा याच सेक्टरमधून आहे. यांच्या स्टॉकमध्ये ८, १३२ टक्के वृद्धी झाली आहे. म्हणजे १५ नोव्हेंबर २००२ ला याच्या एका शेअरची किंमत ८४४ रूपये होती. जी आता १७ नोव्हेंबर २०१७ ला ६९,४७७ इतकी झाली आहे. 

या कंपन्यांनाही फायदा

TVS Srichakra आणि CEAT कंपन्यांचे शेअर्सही तेजीत आहे. नोव्हेंबर २००२ ते २०१७ दरम्यान यांच्या शेअर्समध्ये क्रमश: ७,६७५ आणि ६,१५९ टक्के वाढ झाली आहे. 

या गुंतवणूकदारांनाही फायदा

Goodyear india, JK Tyre, Apollo Tyres चे गुंतवणूकदारही मालामाल झाले आहेत. या कंपनीत गुंतवणूकदारांना क्रमश: २,९९६ टक्के, २,६५८ टक्के आणि १,७०१ टक्के फायदा मिळाला. 

BSE सेंसेक्समध्ये १ हजार टक्के वाढ

इक्विटी बेंचमार्च BSE सेंसेक्स नोव्हेंबर २००२ ते २०१७ दरम्यान साधारण १ हजार टक्क्याच्या वाढीसोबत ३,०३४ वरून ३३,३४३ वर पोहोचला आहे.