दिल्लीत आमदार-खासदारांचं २ दिवसीय संमेलन

दिल्लीत खासदार आणि आमदारांचं 2 दिवसीय संमेलन आयोजित करण्यात आलंय. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 11, 2018, 12:38 AM IST
दिल्लीत आमदार-खासदारांचं २ दिवसीय संमेलन title=

नवी दिल्ली : भारतीय संविधानाचे जगात एक विशेष स्थान असून संविधानाच्या माध्यमातून सामाजिक न्यायावर विशेष लक्ष देण्यात आलं, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढलेत. दिल्लीत खासदार आणि आमदारांचं 2 दिवसीय संमेलन आयोजित करण्यात आलंय. 

खासदार आणि आमदारांना संबोधित केलं

या निमित्त दिल्लीतल्या सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार आणि आमदारांना संबोधित केलं. वुई फॉर डेव्हलपमेंट या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आलीय. त्यावेळी मोदी बोलत होते. 

घराघरात वीज पोहचवणे, जे जिल्हे आणि गावं मागास राहिले त्यांचा विकास करणं हे आपलं कर्तव्य असल्याचे ते म्हणालेत.