हैदराबाद : एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी आज तेलंगणातील राज्यसभेच्या 3 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
राज्यात सत्तेत असणाऱ्या तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस)च्या उमेदवारांना एमआयएमने आपला पाठिंबा दिला आहे. तेलंगणातील राज्यसभेच्या तीन जागांवर 23 मार्चला निवडणुका होणार आहेत.
119 सदस्यांच्या तेलंगणा विधानसभेमध्ये टीआरएसचे 82, काँग्रेसचे 19, एमआयएमचे 7, भाजपचे 5, तेलगू देशम पक्षाचे 3, सीपीआयएमचा 1, सीपीआयचा एक आणि अपक्ष एक आमदार आहे. एमआयएमचं समर्थन मिळाल्याने टीआरएसच्या तिसऱ्या जागेवर जिंकण्याची शक्यता वाढली आहे. कारण काँग्रेसने या निवडणुकीत आपला उमेदवार मैदानात उतरवण्याचा विचार करत आहे.