वाराणसी : पीएम नरेंद्र मोदी शनिवारी रात्री आपल्या मतदारसंघात विकास कामांचा दौरा करण्यासाठी गेले होते. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील त्यांच्यासोबत होते. वाराणसीमध्ये रात्री निघालेल्या पंतप्रधानांच्या ताफ्यासमोर अचानक दोन बैल आहे. गाडी समोरच ते एकमेकांशी भिडले. ही गोष्ट पाहून प्रशासनाला घाम फुटला. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस आणि जवानांनी या दोन्ही बैलांना हकलवण्याचा प्रयत्न केला आणि बाजुला केलं.
बैलांना बाजुला केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा ताफा पुढे निघाला. बैल पंतप्रधानांच्या गाडीसमोर भांडत होते. पोलिसांच्या प्रयत्नानंतरही ते बाजुला होत नव्हते. पंतप्रधान मोदी पुढच्याच सीटवर बसले होते. तर योगी आदित्यनाथ मागच्या सीटवर बसले होते. बैलांच्या या भांडणामुळे मोदींचा हा ताफा काही काळ थांबून राहिला.