टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीनच्या किंमती वाढणार?​

या वस्तूंवर आता २८ ऐवजी १८ टक्की जीएसटी वसुल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय

Updated: Jul 25, 2018, 12:39 PM IST
टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीनच्या किंमती वाढणार?​ title=

मुंबई : जीएसटी अर्थात गुडस अॅन्ड सर्व्हिस टॅक्स घटल्यानंतर टीव्ही, फ्रीजच्या किंमती कमी झाल्यात. परंतु, आयात करण्यात आलेले टीव्ही, फ्रीज लवकरच महाग होऊ शकतात. कारण, अशा वस्तूंवर सरकारकडून आयात कर वाढण्याचा निर्णय करतंय. २१ जुलै रोजी झालेल्या जीएसटी काऊन्सिल बैठकीत टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन सारख्या वस्तूंवर आता २८ ऐवजी १८ टक्की जीएसटी वसुल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

सूत्रांच्या माहितीनुसार, जीएसटी घटल्यानंतर या वस्तूंची मागणी वाढेल... परंतु, टॅक्स घटल्यानंतर आयातीत वस्तूंच्याही मागणीत वाढ होईल आणि स्थानिक किंवा मेक इन इंडिया वस्तूंना त्याचा फटका बसेल, अशी भीती राज्यांनी व्यक्त केली. त्यानंतर अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी यावर उपाय म्हणून आयात कर वाढवण्याचा विचार करण्याचं त्यांनी आश्वासन दिलंय.