Trending Video: मॅडमना राग का आला... ? SDM संतापताच Video तुफान व्हायरल

Viral Video: हरदोईच्या एसडीएम सदर स्वाती शुक्ला त्यांचं म्हणणं नोंदवण्यासाठी रुग्णालयात पोहोचल्या होत्या. त्या थेट आपत्कालीन विभागात गेल्या.

Updated: Oct 11, 2022, 03:45 PM IST
Trending Video: मॅडमना राग का आला... ? SDM संतापताच Video तुफान व्हायरल title=
Trending Video SDM Got Angry viral on Social media nmp

SDM Got Angry Video: मोबाईल फोनमुळे आजकाल कुठलीही घटना सहज व्हायरल (Viral ) होतोत. असाच एक उत्तर प्रदेशातील  (Uttar Pradesh) हरदोई जिल्ह्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हरदोईच्या (Hardoi) एसडीएम सरकारी रुग्णालयात पोहोचल्यानंतर एसडीएम तुफान वैतागल्या. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) वाऱ्यासारखा पसरत आहे. 

मॅडमना राग का आला... ?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिल्ह्यात एका तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मुलीला गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती प्रशासनाला दिली असता, हरदोईच्या एसडीएम सदर स्वाती शुक्ला त्यांचं म्हणणं नोंदवण्यासाठी रुग्णालयात पोहोचल्या होत्या. त्या थेट आपत्कालीन विभागात गेल्या. (Trending Video SDM Got Angry viral on Social media nmp)

म्हणून त्या वैतागल्या

तिथे तैनात असलेल्या आपत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एसडीएमला बसण्यासाठी खुर्चीही दिली नसल्याचा आरोप होत आहे. एवढंच नाही तर एसडीएमने उभे असताना मुलीची प्रकृती आणि उपचाराबाबत विचारणा केली असता, त्या डॉक्टरलाही समाधानकारक उत्तर देता आलं नाही. यामुळे एसडीएम संतप्त झाले. त्यांनी तात्काळ जिल्ह्याच्या सीएमओला फोन केला. प्रथम फोनवर एसडीएमने डॉक्टरांबाबत विचारणा केली.

'डीएम सरांना पत्र लिहीन'

यानंतर एसडीएमने सीएमओला फोनवर सांगितलं, 'तुमच्या डॉक्टरांना शिष्टाचार शिकवा. उद्या मी ते डीएम साहेबांना लिहीन. चंद्रकांत नाव आहे ना... ते कोणत्या पदावर आहेत? मी त्यांना नंतर बघेन. आणि पुढच्या वेळेस असे बोलला तर डॉक्टरला खेचून पोलीस ठाण्यात बसवणार, इतक्यात खोलीच्या गेटजवळ उभ्या असलेल्या कोणीतरी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला. हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.