Baby Shower Viral Video : डोहाळजेवणात नवरा - बायकोने केलं असं काही की.., खिळल्या सगळ्यांच्या नजरा

Couple Viral Video :  सोशल मीडियावर एका गर्भवती महिला आणि तिच्या नवऱ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. डोहाळजेवणात या दोघांनी जे काही केलं त्यानंतर सर्वत्र त्यांचीच चर्चा आहे. 

Updated: Feb 12, 2023, 10:50 AM IST
Baby Shower Viral Video : डोहाळजेवणात नवरा - बायकोने केलं असं काही की.., खिळल्या सगळ्यांच्या नजरा title=
Trending Video Pregnant Woman Dance With Husband Trending song Tu Maan Meri Jaan on baby shower Couple video viral on Social media

Pregnant Woman Dance With Husband Viral Video : सोशल मीडियावर (Social media) कधी कुठला ट्रेंड (Trending Video) येईल सांगता येतं नाही. सध्या सोशल मीडियावर एक लोकप्रिय गाण्यावर व्हिडीओ आणि रील्सची धूम सुरु आहे. अगदी बघावं तिकडे हे गाणं वाजतं आहे. प्रत्येकांच्या ओठावर सध्या हे गाणं आहे. कुठला कार्यक्रम असो किंवा सहज चार चौघ बसले असो हे गाणं वाजतंच...अगदी सध्या पार्ट्यांमधील ट्रेंडिंग गाणं (Trending song) जे इन्स्टाग्रामवरही (Instagram Reels) धुमाकूळ घालतं आहे. आलं का लक्षात...आम्ही बोलतोय ते 'तू मान मेरी जान' ...या गाण्यावर डोहाळ जेवण्याचा क्षणी नवरा बायकोने (Couple Viral Video) जे केलं त्यानंतर सगळ्यांच्या नजरा त्यांचावर खिळल्या.

क्या बात है!

या इन्स्टाग्रामवरील व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता गर्भवती महिला (Pregnant Woman Video) आणि तिच्या नवऱ्याने एका गाण्यावर डान्स केला. हा व्हिडीओ या महिलेच्या डोहाळ जेवणाचा म्हणजे बेबी शॉवरचा (baby shower Video) आहे. या व्हिडीओमध्ये अनेक पाहुणे उपस्थित आहे. पिवळ्या साडीत गर्भवती महिला अतिशय सुंदर दिसतं आहे. तिने आणि तिच्या नवऱ्याने या ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करायला सुरुवात केली आणि सगळे अवाक् झाले. तू मान मेरी जानवर डान्स करताना ती खूप आनंदी दिसत आहे. नवराही तिला पाहत स्टेप करत आहे. एकंदरीत त्यांचा या डान्सने वेगळाच माहोल तयार झाला. (Trending Video Pregnant Woman Dance With Husband Trending song Tu Maan Meri Jaan on baby shower Couple video viral on Social media)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडिओला दशलक्ष व्ह्यूज

डिंपल ब्रह्मभट्टने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या इंस्टाग्राम बायोमध्ये, डिंपलने स्वत:चे मेकअप आर्टिस्ट म्हणून वर्णन केले आहे आणि ती मुंबईची आहे. व्हिडीओमध्ये त्याने इंस्टाग्राम युजर्स शिवानी श्रॉफ आणि निशिकेत पारीख या जोडप्याला टॅग केले. जे व्हिडीओमध्ये डान्स करत होते. इन्स्टाग्रामवर नुकताच शेअर केलेला हा व्हिडिओला आतापर्यंत 1.1 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर 48.5K वापरकर्त्यांनी व्हिडीओला लाइक्स केले आहेत.