Delhi-Mumbai Expressway : समृद्धी महामार्गामुळे (Samruddhi Mahamarg) नागपूर - मुंबई या (Mumbai Nagpur Expressway) शहरामधील अंतर कमी झाल्यानंतर आता दिल्ली मुंबईचं (Delhi-Mumbai Expressway) अंतर कमी झालं आहे. देशातली सर्वात लांब महामार्ग असलेल्या दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा पहिला टप्पा तयार झाला आहे. या महामार्गामुळे मुंबई (Mumbai) ते दिल्लीमधील (Delhi) अंतर गाठायला आता फक्त 12 तास लागणार आहेत. तर दिल्ली ते जयपूर 5 तासांमध्ये पोहोचता येणार आहे. याचा अर्थ दिल्ली ते जयपूर प्रवास 3.5 तासांने कमी झाला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) या महामार्गाचं उद्घाटन करणार आहेत. त्यापूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या महामार्गाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) शेअर केला आहे. या महामार्गाची पहिली झलक त्यांनी देशवासीयांना दिली आहे. (Delhi-Mumbai Expressway Prime Minister Modi will inaugurate Delhi Mumbai highway today 12 February and nitin gadkari shared VIDEO anand mahindra Retweet in marathi news)
उद्घाटनापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर दिल्ली (Delhi) मुंबई (Mumbai) एक्स्प्रेस वेचा (Delhi-Mumbai Expressway) व्हिडीओ शेअर केला होता.
Aesthetic night views from the architectural marvel #Delhi_Mumbai_Expressway. Have a look!!#BuildingTheNation #PragatiKaHighway #GatiShakti pic.twitter.com/akjlyDVwnw
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 10, 2023
विशेष म्हणजे उद्योगपती आनंद महिंद्रा (anand mahindra) यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.
You’ve reminded us that infrastructure isn’t boring—it can be magical. I was planning to drive on this expressway-no, dreamway-in the day, but now I think I will plan a night cruise… https://t.co/peCFsblv2J
— anand mahindra (@anandmahindra) February 10, 2023
आता दिल्लीकर आणि मुंबईकरांना या रस्त्यावरून कधी प्रवास करता येईल यांची उत्सुकता आहे. समृद्धी महामार्गावर सुसाट गाड्या चालवल्यामुळे अनेक अपघात झाले. त्यामुळे या महामार्गावर वेगमर्यादा किती असेल आणि अपघात टाळण्यासाठी काय काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत ते पाहावं लागेल.