Viral Video: पेट्रोल - डिझलचे दिवसेंदिवस वाढलेले दर पाहून बहुताश वाहनचालक वैतागले आहेत. अशात नवीन वाहन खरेदी करणारे लोक सीएनजी असलेल्या वाहनाला प्राधान्य देत आहेत. तर काही लोक जुन्या गाडीतच सीएनजी लावून घेत आहेत. तुम्ही जेव्हा सीएनजी स्टेशनवर गॅस भरायला जाता तेव्हा तु्म्हाला गाडीतून उतरायला सांगतात. त्याचा मागचं कारण तुम्हाला माहिती आहे का?
सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. तो पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल. धक्कादायक आणि भीतीदायक असा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ एका सीएनजी स्टेशनवरील आहे. (trending video car explosion at cng pump viral video on social media and person life was saved watch video)
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका सीएनजी स्टेशनवर कारमध्ये गॅस भरत आहे. सगळं एकदम व्यवस्थित सुरु आहे. काही क्षणात तिथे काय घडणार आहे याची कोणालाही कल्पना नसते. सीएनजी स्टेशनवरील कर्मचारी आणि कार चालक कारपासून काही अंतरावर उभे आहेत. या दोघांच्या धानीमनी नसतानाही थोड्याच वेळात कारच्या मागच्या बाजूस भीषण स्फोट होतो.
या स्फोटमुळे कार खिळखिळी झाली आहे, यावरुन तुम्हाला हा स्फोट किती भयानक होता हे लक्षात येईल. हा स्फोट झाल्यावर कर्मचारी आणि कारचालक आपला जीव मुठीत घेऊन लांब पळून गेले. त्यानंतर काही वेळानंतर ते नेमकं काय घडलं म्हणून पाहिला येतात.
हा नेमका व्हिडीओ कुठला आहे त्याबद्दल काही माहिती नाही. मात्र शेअर मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला आहे. हे एक सीसीटीव्ही फूटेज असून यात 16 मार्च 2022 अशी तारीख दिसते आहे. मात्र या व्हिडीओमध्ये लोकेशनबद्दल कुठलीही माहिती नाही.
आतापर्यंत या व्हिडीओला 16 हजारपेक्षा जास्त लाइक मिळाले आहेत तर 3 हजार वेळा हा व्हिडीओ रिट्वीट करण्यात आला आहे.